Lumpy skin disease
Lumpy skin disease  esakal
नाशिक

Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात 6 जनावरांना लम्पीची लागण; 2 जनावरे दगावली

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lumpy Disease : शहरासह जिल्ह्यात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात ‘लम्पी स्कीन’ आजाराने जिल्ह्यात पुन्हा आगमन झाले आहे.

गत आठवडाभरात जिल्ह्यातील ४० जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, यातील ३४ जनावरे बरी झाली. जिल्ह्यात आठ दिवसांत दोन जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. (Lumpy infected 6 animals in district nashik news)

गेल्या वर्षी जिल्ह्यात पसरलेल्या लम्पी स्कीन आजाराने जवळपास ११५ जनावरांचा बळी घेतला. यापैकी १०३ पशुमालकांना २६ लाख ७९ हजार रुपयांची मदत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. उर्वरित प्रस्ताव प्रक्रियेत असल्याने प्रतीक्षेत आहेत. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर देऊन या मृत्यूदरावर बऱ्यापैकी नियंत्रण आणले होते.

असे असताना ‘लम्पी स्कीन’ आजाराने जिल्ह्यात पुन्हा आगमन झाले आहे. या आजारामुळे मालेगाव व दिंडोरी तालुक्यात दोन जनावरांचा मृत्यू झाला. यात दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील एका शेतकऱ्याच्या सहा महिन्यांच्या वासराला हा आजार झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पशुमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मालेगाव तालुक्यातील मौजे टाकळी व सिन्नर तालुक्यातील मौजे माळेगाव या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजार या साथरोग आजाराची लक्षणे आढळून आलेली आहेत. तसेच, आजाराच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेचे निष्कर्ष होकारार्थी आलेले आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बाधित क्षेत्र घोषित

मालेगाव तालुक्यात मौजे टाकळी व सिन्नर तालुक्यात मौजे माळेगाव या संसर्ग केंद्रापासून चार किलोमीटर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांनी बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर परिघातील जनावरांना प्रतिबंधित लसीकरणाचे नियोजन करावे व शीघ्र कृती दल स्थापन करून साथीचा आजार नियंत्रणात आणण्याची तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना पशुसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.

"लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी गोठे स्वच्छता, लसीकरण आणि प्रतिबंधीत क्षेत्र असे उपाय सुरू आहेत. जिल्हा परिषदेने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही लसीकरणास सुरवात केली." - संजय शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT