Lumpy skin animal disease Sakal
नाशिक

Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद; लम्पीबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा घोषित

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संपूर्ण नाशिक जिल्हा जनावरांमधील लम्पी चर्मरोग बाधित क्षेत्र म्‍हणून घोषित केला आहे.

पशुसंवर्धन विभागाने गोवर्गीय पशुधनातील या साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी मंगळवारी (ता. २९) दिल्या. (Lumpy skin Disease Animal market closed in district nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयात लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय जाहीर केला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यातील १२ तालुक्यांत लम्पीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण शीघ्र कृती दल स्थापन करून हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधित लसीकरणाच्या नियोजनाची कार्यवाही करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संपूर्ण जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांची खरेदी- विक्री, बाजार, शर्यती व जत्रा, प्रदर्शनास प्रतिबंध करावा. आंतरराज्य, आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत गोवर्गीय पशुधनाची सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस यंत्रणेचे सहाय्य घ्यावे.

रस्त्यावर तपासणी नाके

परराज्यांतून जे गोवर्गीय पशुधन जिल्ह्यात येत असेल, त्याच्या तपासणीसाठी आंतरराज्य मार्गावर तपासणी नाका सुरू करावा, लक्षणे आढळल्यास तत्काळ लगतच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाशी संपर्क साधावा, गोठ्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे निर्जंतुक फवारणी करावी, संबंधित विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT