Officers of the organization, teachers during the march organized by the Maharashtra State Primary Teachers Association at the golf club ground. esakal
नाशिक

Nashik Teachers Protest : प्राथमिक शिक्षकांचा टाहो! ‘आम्हाला शिकवू द्या हो’चा आक्रोश; गोल्फ क्लबवरच काढला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Teachers Protest : प्राथमिक शिक्षकांना देण्यात आलेली अशैक्षणिक कामे, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन माहिती, नोकऱ्यांचे खासगीकरण आदी मागण्यांसाठी राज्यभरात जिल्हा परिषदांवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव शासनाला व्हावी, यासाठी हे मोर्चे काढले जात आहेत. शासनाने प्रश्नांची दखल वेळेत न घेतल्यास आंदोलन तीव्र करून थेट मुंबईतील विधानसभावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिला.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचेच काम करू द्यावे. इतर कुठलेही कामे करण्याची सक्ती करू नये, यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे सोमवारी (ता. २) महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Maha Akrosh Morcha was organized by Maharashtra State Primary Teachers Association nashik protest news)

मात्र, पोलिस प्रशासनाने ऐनवेळी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे गोल्फ क्लबवर जमा झालेल्या जिल्हाभरातील विविध शिक्षक, शिक्षिका यांनी संघटेनेचे कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरच मोर्चा काढत निषेध नोंदविला.

मोर्चानंतर झालेल्या सभेत नेत्यांची भाषणे झाली. कार्याध्यक्ष डिंबळे यांनी शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त अनेक कामे दिली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य शासनाने अशैक्षणिक कामे त्वरित काढून घ्यावी, अशी मागणी केली. सभेला उपस्थितीत नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या प्रलंबितप्रश्नी विधिमंडळात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.

शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे. याबरोबरच शासनाने सक्ती केलेल्या निवडणूक व जनगणना यांची कामे सोडून इतर कामे देऊ नये. आम्हा शिक्षकांतर्फे शिकविण्याबरोबरच गुणवत्ता टिकविण्यासाठी आम्ही बांधील राहू, असेही वाजे यांनी सांगितले. त्यानंतर संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सभेला संघाचे जिल्हा नेते अर्जुन ताकाटे, जिल्हाध्यक्ष बाजीराव सोनवणे, सरचिटणीस निवृत्ती नाठे, कार्यकारी अध्यक्ष धनंजय आहेर, प्रदीप पेखळे, दीपक सोनवणे, किरण सोनवणे, संगीता पवार, नितीन पवार, रामदास शिंदे, सुनील शिंदे, नलिनी बच्छाव, मिलिंद गांगुर्डे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब धाकराव, चंद्रकांत महाजन, विनाक ठोंबरे, प्रदीप शिंदे, देवीदास पवार, बाबाजी आहेर, रामदास शिंदे, चंद्रकांत थोरमिसे, संजय आहेर आदी उपस्थित होते.

संघटनेच्या प्रमुख मागण्या अशा

सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे, ऑनलाइन माहिती, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप बंद करून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्याचेच काम द्या, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वस्तीशाळा शिक्षकांना शाळा स्थापनेपासून नोकरीत कायम करण्यात यावे, खासगी यंत्रणेला सरकारी शाळा चालविण्यास देण्यात येऊ नये, बाह्य यंत्रणेमार्फत काम करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी नेमण्याबाबतचा ६ सप्टेंबर २०२३ चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT