mla satyajeet tambe set up in nashik yuva mahiti kendra politics
mla satyajeet tambe set up in nashik yuva mahiti kendra politics esakal
नाशिक

Satyajeet Tambe : ब्राह्मणगावला पहिले युनोव्हेशन सेंटर; आमदार सत्यजित तांबे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

Satyajeet Tambe : महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातील युवकांचा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन जिल्ह्यात पहिले युनोव्हेशन सेंटर (युवा माहिती केंद्र) ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथे सुरू करीत असल्याचा आनंद होत आहे.

या सेंटरमध्ये तरुणांना शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील अद्ययावत माहिती मिळणार असून, हे केंद्र तरुणांचे हक्काचं व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.(MLA Satyajeet Tambe statement First Innovation Center in Brahmangaon nashik news)

आमदार तांबे म्हणाले, की तरुणांना त्यांच्या उपयोगाची माहिती एकाच ठिकाणी मिळेल, असं ठिकाणच भारतात नाही. समविचारी तरुणांना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी जागाही नाही. त्यामुळेच युनोव्हेशन सेंटरची संकल्पना सुचली.

महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातील युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या पायावर स्वतःला सिद्ध करता यावे, रोजगार आणि नोकरीच्या संधी निर्माण व्हावी, हा माझा ध्यास आहे. त्यामुळेच हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तरुणांना या केंद्रावर जगभरातील संधींची माहिती मिळावी, त्यांना कोणत्याही गोष्टीतील मार्गदर्शन लागल्यास ते उपलब्ध व्हावे, त्यांना हक्काचं व्यासपीठ असावं, हा या सेंटरमागचा उद्देश आहे.

जयहिंद लोकचळवळ या संघटनेच्या माध्यमातून अशी केंद्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारली जाणार आहेत. ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथे जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरू होणार असल्याने जिल्ह्यात हा मान बागलाण तालुक्याला मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

राजकीय, आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याबरोबरच राज्यभरातील तरुणांना जगाची कवाडं खुली व्हावी, शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील अद्ययावत माहिती मिळावी, हा या युनोव्हेशन सेंटर (युवा माहिती केंद्र) मागील प्रमुख उद्देश असल्याचेही आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

तरुणांचा काय होणार फायदा?

या केंद्रात तरुणांच्या आयुष्यातील विविध समस्यांवर तोडगा काढून त्यावर उपाययोजना केल्या जातील. करिअर गाइडन्स, देशविदेशातील विविध अभ्यासक्रमांची आणि विद्यापीठांची माहिती, सरकारी शिष्यवृत्ती आणि मदतीबाबत माहिती, तसेच विविध कौशल्य विकास मार्गदर्शन अभ्यासक्रम घेतले जाणार आहेत.

उद्योजकता या विषयात रस असलेल्या तरुणांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत, सरकारकडून किंवा खासगी माध्यमातून मिळणाऱ्या निधीबाबत मार्गदर्शन केले जाईल. को-वर्किंग जागा तयार करण्याचा आमचा प्रयत्न असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तसेच नोकरीतील विविध संधींबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT