Work in progress to implement Tajia.  esakal
नाशिक

Muharram 2023 : मोहरम पर्वास आजपासून प्रारंभ; मशिदीमध्ये कुराण खानी संपन्न

सकाळ वृत्तसेवा

Muharram 2023 : इस्लामिक नवीन वर्षाचा पहिला महिना मोहरमपर्वाला गुरुवार (ता. २०)पासून प्रारंभ झाला. (Muharram 2023 starts from today 20 july nashik news)

बुधवारी (ता. १९) चंद्रदर्शन घडल्याने सायंकाळी मगरीबनंतर अर्थात रात्री आठनंतर मोहरमच्या पहिल्या तारखेस सुरवात होऊन मोहरमपर्वास प्रारंभ झाला आहे.

बुधवारी शहरातील विविध मशिदीमध्ये कुराण खानी संपन्न झाली. पुढील दहा दिवस दैनंदिन मशीदमध्ये कुराण खानी होणार आहे. दरम्यान, जुने नाशिक, वडाळागावात विविध ठिकाणी धार्मिक प्रवचनाचे कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी (ता. २९) मोहरम (आशुरा) सण साजरा केला जाणार आहे. काही मुस्लिम बांधवांची मोहरमनिमित्ताने ताजिया आणि सवारी स्थापना करण्याची परंपरा आहे.

मोहरम महिन्याची ऊर्दू ६ तारखेस ताजिया आणि सवारीची स्थापना करण्यात येत असते. मोहरमच्या दहाव्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. त्यानिमित्ताने ताजिया साकारणेसह अन्य विविध कामास वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT