ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : स्पर्धेत अधिकाऱ्यांची दादागिरी...!

सकाळ वृत्तसेवा

सध्या नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. यात जिल्हा सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचे देखील संघ सहभागी होत आहेत. या अधिकाऱ्यांची या स्पर्धेत देखील दादागिरी सुरू झाली आहे की काय, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्हा पातळीवरच्या स्पर्धा होणार आहेत. (Naroshankarachi ghanta sakal special zp sports competition Bullying by officials nashik new)

तत्पूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये अनेक गमतीजमती घडत आहेत. विशेषतः अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या संघांची मैदानावर देखील दादागिरी दिसून येत असल्याने चांगलीच करमणूक होत आहे.

एका तालुका पातळीवरील संघाचा नाशिक जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाच्या अधिकारी असा महिलांचा क्रिकेटचा सामना सुरू होता. तालुका संघात अर्थातच महिला शिक्षिकांचा सहभाग जास्त होता.

अटीतटीच्या वेळी एका महिला खेळाडूने चांगलेच जोरदार अपील केल्याने खडाजंगी झाली. त्या वेळी अधिकाऱ्यांच्या संघात असलेल्या एका अधिकारी महिलेने, ‘तुमची शाळा कोणती’, असे विचारले.

त्यामुळे काही काळ प्रतिस्पर्धी संघातील महिलादेखील अवाक झाल्या. अधिकारी शाळा विचारतात म्हणून आता जीव तोडून खेळायचे की सामना सोडून द्यायचा, असा विचार काही क्षण या संघाच्या सहकाऱ्यांमध्ये आला. मात्र पुढील सामना सुरळीतपणे पार पडला असला तरी तो अधिकाऱ्यांनी जिंकला, यातच सारेकाही आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT