Vaccination nashik esakal
नाशिक

नाशिक : लसीकरण कमी झाल्याने कोरोना निर्बंध जैसे थे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या (Corona) निर्बंधमुक्तीस आवश्यक असलेले 3 टक्के लसीकरण कमी झाल्याने राज्यात 14 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल झाले असताना नाशिकला मात्र ‘जैसे थे’ स्थिती राहणार आहे. राज्यात इतरत्र निर्बंध घटविले असताना नाशिककरांना मात्र आणखी काही दिवस तरी निर्बंधमुक्तीसाठी (Restriction Free) वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात शासनाने बुधवारी नवी नियमावली जाहीर केली. राज्य सरकारने (state Government) 14 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करताना नाट्यगृह (Drama Theater), सिनेमागृहे (Cinema Theater), रेस्टॉरंट (Restaurant) 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र नाशिकमध्ये पूर्वीचेच निर्बंध कायम आहेत. मात्र यात ज्या 14 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्यात नाशिकचा सामावेश करण्यात आलेला नाही.

नाशिक का निर्बंधात?

ज्या जिल्ह्यात पहिला डोस 90 टक्के नागरिकांनी, तर दुसरा डोस 70 टक्के नागरिकांनी घेतलेला आहे तेथे निर्बंध शिथिल झाले आहेत. नाशिकला पहिला डोस 86 टक्के , तर दुसरा 60 टक्के असल्याने नाशिकमध्ये निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत नाशिकमध्ये 303 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही (Positivity Rate) 0.56 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मात्र राज्य सरकारने निर्बंधांत शिथिलता देताना कोरोना लसीकरणाबाबत ठरवून दिलेल्या निकषात नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) सामावेश होत नसल्याने निर्बंध 'जैसे थे' च ठेवण्याचा निर्णय घेतला.

चौदा जिल्हे निर्बंधमुक्त

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदींसह 14 जिल्ह्यांना A श्रेणीत टाकले आहे. A या श्रेणीतील जिल्ह्यातील 90 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के आहे. ऑक्सिजन सपोर्टेड बेडची किंवा ICU तील बेडची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

''नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे; परंतु लसीकरणाबाबत (Vaccination) नागरिकांनी स्वतः पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे. सध्या पहिला डोस ८६ टक्के, तर दुसरा ६० टक्केच नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.'' - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

काय आहेत निर्बंध?

- विवाह सोहळ्यासाठी फक्त ५० उपस्थिती

- सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा

- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के उपस्थिती

- राजकीय कार्यक्रमांनाही ५० टक्के उपस्थितीचे बंधन

- निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI : ४१ धावा अन् रोहित शर्मा 'मोठ्या' खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल, जबरदस्त विक्रम नोंदवण्याची संधी

Nagpur Tiger: सालेघाट जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू; कोणतीही जखम नाही, वनविभागाचा तपास सुरू

Latest Marathi News Live Update : हिंजवडीतील नामांकित शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Sinnar Election : मतदान केंद्रावर 'मिरची स्प्रे'चा हल्ला; सिन्नरमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार

Vastu Tips For Money: तुमच्याही खिशात पैसे राहत नाहीत का? मग धनवाढीसाठी करा 'हे' खास उपाय

SCROLL FOR NEXT