Nashik News_Nivrutti Khatale_Manjula Khatale 
नाशिक

धक्कादायक! ज्यानं मुलीचं अपहरण केलं त्याच्याच घराबाहेर केले आई-वडिलांवर अंत्यसंस्कार

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागातील या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं हताश झालेल्या आई-वडिलांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळाली कॅम्प इथं घडली. पण ज्या तरुणानं मुलीचं अपहरण केलं त्याच्या घरासमोर मुलीच्या मृत आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. (Nashik Crime body of Khatale couple cremated outside of person Samadhan Jhankar who kidnapped their daughter)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, रविवारी दुपारी निवृत्ती खातळे हे आपली पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे आणि मुलीसह भरविहिर गावाकडं जात होते. वाटेत घोटी हायवे जवळ वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर आणि त्याच्या साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली. यानंतर त्यांनी मुलीला आई-वडिलांसमोरच आपल्या वाहनात बसवून घेऊन गेले. (Nashik Crime News)

एकतर्फी प्रेमातून आपल्या १९ वर्षीय तरुण मुलीचं डोळ्यासमोर अपहरण झाल्यानं निराश झालेल्या खातळे दांपत्यानं भगूर येथील नूतन शाळेमागे गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेची नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून तर मुलीचे मामा दिगंबर शेळके यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांत झनकर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी भरविहिर येथील गावकरी आणि नातेवाईकांनी खातळे दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर याच्या घरासमोरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT