SP Sachin Patil esakal
नाशिक

Nashik | पोलिस अधिक्षक बनले शिक्षक! बडबडगीत, कवितांचेही सादरीकरण

नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी देवळा तालुक्यातील फांगदर जिल्हा परिषद शाळेला भेट दिली

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा (जि. नाशिक) : नेहमीच कायदा- सुव्यवस्था, गुन्हेगारीच्या विश्‍वात रममाण होणारे पोलिस अधिकारी जेव्हा शाळेत येतात. ज्या कोवळ्या वयात मुलांना पोलिसांचा धाक, पोलिसांबद्दल प्रचंड आकर्षण वाटते, त्या मुलांसमोर उभे राहून कोमल भाषेत बालगीत, बडबडगीत, कविता, ऱ्हाईम्स म्हणत मुलांना लडिवाळपणे गोंजारत आनंदायी वातावरणात अध्यापन देणे, तसे दुर्मिळच! पण, नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी देवळा तालुक्यातील फांगदर जिल्हा परिषद शाळेला भेट दिली अन्‌ ते मुलांमध्ये केव्हा रमले तेच कळाले नाही. (Latest Marathi News)

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी येथील उपक्रमशील शाळेला भेट देत शाळेचे उपक्रम जाणून घेतले. सवरॊ उपक्रम पाहून मुलांना अध्यापन करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. पहिलीत नवीनच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच दुसरीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी अल्फाबेट, स्मार्टबोर्डच्या माध्यमातून मुळाक्षरे, बडबडगीत येरे येरे पावसा, चांदोबा चांदोबा भागलास काय, मछली जल की राणी है आदी गीते स्वतः कृती करून म्हणून दाखवली.

विद्यार्थ्यांकडूनही कृती करून घेतली. या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी साहित्याच्या मदतीने एकक, दशक, संख्या ओळख प्रत्यक्ष करून घेतली. तिसरी, चौथीच्या वर्गात विद्यार्थ्यांना गुणाकार तसेच भागाकाराची गणिते स्वतः सोडवून दाखवली. तिसरी, चौथीच्या पाठ्यपुस्तकातील कविता, ऱ्हाईम्स विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतल्या.

संवेदनशीलतेचे दर्शन

जिल्ह्याचे पोलिस अधिकारी म्हटले की २४ तास गुन्हेगारीशी संबंध, ताण, तणावाचा होणारा परिणाम... पण, आज पोलिस मुख्यालयापासून शंभर किमी अंतरावर असणाऱ्या द्विशिक्षकी शाळेला भेट देत अतिशय संवेदनशिलतेने सचिन पाटील यांनी मुलांशी गप्पा- गोष्टी केल्या. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन झाल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी देवळ्याचे पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे, गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र शेवाळे, दीपक मोरे, धनराज शेवाळे, प्रकाश शेवाळे, साहेबराव मोरे, हेमंत मोरे, नंदू बच्छाव, भूषण आहेर, विजय मोरे, बबन सूर्यवंशी, अमित मोरे, दत्तात्रय बच्छाव, दीपक सूर्यवंशी, देविदास मोरे उपस्थित होते. मुख्याध्याप संजय गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. खंडू मोरे यांनी आभार मानले.

''ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम भागात द्विशिक्षकी शाळेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकसहभागातून साधलेला विकास व शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा केलेला गुणवत्ता विकास या शाळेत पहायला मिळाला. खासगी शाळांना देखील लाजवेल, असा बदल दोघा शिक्षकांनी घडवून आणला आहे. '' - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT