Recovery of dues by beating the drum from the Western Division esakal
नाशिक

Dhol Bajao Campaign : पश्चिम विभागाकडून महिनाभरात 3 कोटींची थकबाकी वसूल

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पश्चिम विभागातील थकबाकीदारांनी ढोल बजाव मोहिमेची मोठी धास्ती घेतली आहे. घर, व्यवसायासमोर अशाप्रकारे ढोल बडविण्याची वेळ येऊ नये यासाठी थकबाकीदारांनी भरणा करण्यास सुरवात केली आहे. महिनाभरात पश्चिम विभागाकडून ३ कोटी २७ लाखांची थकबाकी वसूल केली आहे. (NMC Dhol Bajao Campaign 3 Crores arrears collected from Western Region within month Nashik News)

अनेक व्यावसायिक, नागरिकांकडून घरपट्टीची थकबाकी भरली जात नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील थकबाकी भरली जात नाही. अशा थकबाकीदारांच्या व्यवसाय अर्थात दुकान, कार्यालयासमोर महापालिकेकडून थकबाकी वसुलीसाठी ढोल पथकाची मदत घेण्यात आली आहे. त्यांच्या दुकाना आणि कार्यालयाबाहेर ढोल वाजवला जात आहे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी अनेक थकबाकीदारांनी ढोल बजाव मोहिमेची धास्ती घेत थकबाकी भरणा केला आहे. ज्या थकबाकीदारांकडून भरणा केला जात नाही, अशांच्या दुकान, कार्यालयासमोर ढोल वाजवून वसुली केली जात आहे.

या माध्यमातून पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने १७ ऑक्टोंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ३ कोटी २७ लाखांची थकबाकी वसुली केली आहे. बाराशे थकबाकीदारांकडून थकबाकी भरण्यात आली आहे. १ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांच्या दुकान आणि कार्यालयाबाहेर ढोल वाजवून वसुली केली जात होती. सोमवार (ता.२१) पासून १ लाखांच्या आतील थकबाकीदारांच्या विरोधातदेखील अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT