Weed killer on onion plants in farmer Dilip Jadhav's field.  esakal
नाशिक

Nashik News: रावळगावी समाजकंटकांच्या कृत्याने शेतकऱ्यांवर ‘दुष्काळात तेरावा महिना’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: दुष्काळी परिस्थिती, बेमोसमी पाऊस अशा नैसर्गिक संकटातून जात असलेल्या बळीराजाला विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. डाळिंब व वीजपंप चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

रावळगाव (ता. मालेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी दिलीप जाधव यांनी अतिशय मेहनतीने जगविलेल्या कांदा रोपांवर काही समाजकंटकांनी तणनाशक फेकले. या प्रकारामुळे तीन एकर लागवड होईल, एवढी रोपे नष्ट झाली आहेत.

समाजकंटकांच्या या कृत्याचा परिसरातून निषेध केला जात आहे. (Onion plants were destroyed by adding herbicides in ravalgaon nashik news)

शेतकरी जाधव यांनी आगामी उन्हाळ कांदा लागवड डोळ्यांसमोर ठेवून कांदा रोपे लावली होती. जवळपास १५ हजार रुपयांचे बियाणे टाकून रोपांची जपणूक केली होती. वेळोवेळी निंदणी, खुरपणी, फवारणी व पाणी देत त्यांनी काळजी घेतली. ५० ते ५२ दिवसांचे रोप टवटवीत होते. या रोपातून तीन एकरवर उन्हाळ कांदा लागवड केली जाणार होती.

दोन-तीन दिवसांत मजुरांच्या उपलब्धतेनुसार उन्हाळ कांदा लागवडीचे नियोजन होते. जाधव कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या कांदा उळ्यावर तणनाशक अथवा इतर औषध फेकले. यामुळे संपूर्ण उळे नामशेष झाले. हिरवेगार उळे काळपट पडले. श्री. जाधव यांचे ५० हजारांवर रुपयांचे नुकसान झाले. अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या कृत्याचा अनेकांनी निषेध करीत संताप व्यक्त केला.

तालुक्यासह ‘कसमादे’त समाजकंटकांकडून अनेकदा शेतकऱ्यांना लक्ष्य केले जाते. काही महिन्यांपूर्वी कांदा चाळींमध्ये नासधूस करण्यात आली.

युरिया टाकून चाळींमधील कांदा खराब करण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. शेतमळ्यातील जनावरे चोरीचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

चोरीच्या घटनांना अटकाव केव्हा?

तालुक्यात चार महिन्यांपासून शेतमळ्यातील चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. मिळत असलेला भाव पाहता चोरट्यांनी आपला मोर्चा डाळिंब बागांकडे वळविला. रात्री-अपरात्री डाळिंबाची चोरी केली जाते. शेतमळ्यांमधील विहिरींवरील वीजपंप चोरीचा सपाटा भुरट्या चोरांनी लावला आहे.

वडनेर खाकुर्डी व तालुका पोलिस ठाण्यात या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. किरकोळ अपवाद वगळता वीजपंप चोरणाऱ्यांना अटकाव करण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले. अनेक शेतकरी किरकोळ चोरीच्या तक्रारी पोलिसांत दाखल करीत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT