Onion sales in Kolkata which is for bangladesh export nashik news
Onion sales in Kolkata which is for bangladesh export nashik news esakal
नाशिक

Onion Export : बांगलादेशासाठीच्या कांद्याची कोलकत्यात विक्री; कमी भावाने विकावा लागला कांदा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : बांगलादेशची आयात खुली होईल, या अपेक्षेने आतापर्यंत ३५० ट्रकभर म्हणजे सात हजार टन कांदा कांद्याचे आगार नाशिक जिल्ह्यातून पाठवण्यात आले. मात्र अद्याप बांगलादेशची आयात खुली झालेली नाही. (Onion sales in Kolkata which is for bangladesh export nashik news)

त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवर पोचलेल्या दीडशे ट्रकपैकी १३० ट्रकमधील कांदा कोलकत्यात विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. खरेदी करून सीमेवर पाठविण्याचा खर्च किलोला साधारणपणे पंधरा रुपयांपर्यंत आला. मात्र कोलकत्यात किलोला दोन रुपये कमी भावाने कांदा विकावा लागल्याने व्यापाऱ्यांना ५२ लाखांचा घाटा झाला आहे.

सामाजिक माध्यमांमधून बांगलादेशमधील स्थानिक कांदा संपला असल्याने आयात सुरू होण्यासंबंधीची माहिती ‘व्हायरल’ होत आहे. त्याच्या आधारे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बांगलादेशसाठी कांदा पाठविण्यास सुरवात केली. बरेच दिवस झाले, तरीही सीमा खुली होत नसल्याने खरेदी केलेल्या कांद्याचे नुकसान होऊ लागल्याने कोलकता बाजारात कांदा विकणे व्यापाऱ्यांनी पसंत केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मात्र याबद्दल व्यापारी खुल्यापणाने काहीही सांगण्यास तयार नाहीत. तरीही काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणखी दोनशे ट्रकभर म्हणजेच चार हजार टन कांदा बांगलादेशच्या दिशेने प्रवासात आहे. हा कांदा सीमेपर्यंत पोचेपर्यंत आयात खुली न झाल्यास मग मात्र याही व्यापाऱ्यांना इतरत्र कांदा विकावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्थानिक बाजारपेठेत आठ रुपये किलो भावाने खरेदी केलेल्या कांद्यासाठी स्थानिक पातळीवर आणखी दोन रुपयांचा खर्च आला. तसेच वाहतूक खर्च किलोला पाच रुपयांपर्यंत पोचला आहे. ही सारी परिस्थिती पाहता, बांगलादेशसाठी पाठविण्यात आलेल्या कांद्याचा भाव किलोला १५ रुपयांपर्यंत पोचला होता.

कोलकत्यात किलोला १२ ते १३ रुपये या भावावर व्यापाऱ्यांना समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, मध्यंतरी खरेदीचा वेग वाढला असताना २२ व २३ मेस क्विंटलला पिंपळगाव बसवंतमध्ये ९५१ रुपये असा भाव उन्हाळ कांद्याला मिळाला होता. तत्पूर्वी ८०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकला जात होता.

२४ मेपासून कांद्याच्या भावात घसरण होण्यास सुरवात झाली. त्यादिवशी क्विंटलला ९०० रुपयांचा सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळाला. गुरुवारी (ता. २५) पुन्हा पूर्वीप्रमाणे ८०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पाकिस्तान कांद्याचा भाव किलोला रुपयाने अधिक

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील नवीन कांदा जागतिक बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मात्र पाकिस्तानच्या कांद्याचा भाव भारतीय कांद्यापेक्षा एक रुपयाने किलोला अधिक आहे.

पाकिस्तानमधील हा कांदा आणखी तीन महिने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र बांगलादेशची आयात सुरू झाल्यावर पाकिस्तानच्या कांद्याचा फारसा परिणाम भारतीय कांद्याच्या विक्रीवर होणार नाही.

उलटपक्षी बांगलादेशची आयात सुरू झाल्यावर भारतीय कांद्याच्या भावात काहीशी वाढ होण्यास मदत होईल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

निर्यातीचा देशनिहाय भारतीय कांद्याचा टनाचा भाव डॉलरमध्ये पुढीलप्रमाणे असून, (कंसात पाकिस्तानच्या कांद्याचा भाव टनाला डॉलरमध्ये दर्शवतो) : मलेशिया- २०५ (२२०), दुबई- २४० (२५५), सिंगापूर- २५० (२६५).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT