satish kulkarni.jpg
satish kulkarni.jpg 
नाशिक

''...अन्यथा दुकाने सुरू करण्याची परवानगी मागे घेऊ''...महापौरांचा इशारा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : लॉकडाउन काळात काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी नागरिकांकडून शासन निर्देशाचे पालन होत नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे दुकानदारांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्यास अशी दुकाने, आस्थापना महापालिकेकडून बंद करण्याचा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. 27) दिला. 

नियमांचे सर्रास उल्लंघन होतंय

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने 20 मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर केला. पहिल्या व दुसऱ्या लॉकडाउनचे काटेकोर पालन झाले. परंतु तिसऱ्या व चौथ्या लॉकडाउनमध्ये नागरिकांची गरज लक्षात घेऊन शासनाने काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. सलून, स्पा, हॉटेल्स, मॉल्स, चित्रपटगृहे वगळता जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. यात भाजी विक्रेते, किराणा, मेडिकल, दूधविक्रेते, पिठाची गिरणी, पशुखाद्य, दवाखाने आदी दुकाने ठराविक वेळेत उघडली जात आहेत. दुकाने उघडताना दुकानदार व ग्राहकांवर शासनाने निर्बंध टाकले आहेत. सामाजिक अंतर ठेवणे, गर्दी होऊ नये याची काळजी घेणे, तोंडावर मास्क लावणे, चारचाकी वाहनांमध्ये फक्त तिघांनाच, तर दुचाकीवर फक्त एकालाच प्रवास करता येणे यांसारखे नियम घालून दिले आहेत. तरी त्याचे सर्रास उल्लंघन झाले आहे. 

महात्मा गांधी रोड, मेन रोड, सीबीएस, मेहेर या भागात गर्दी होत आहे. लॉकडाउनमधील शिथिलतेचा दुकानदारांकडून गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमध्ये दुकाने सुरू करण्याची दिलेली परवानगी मागे घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 

लॉकडाउनमध्ये शिथिलता देताना नियम व अटी टाकण्यात आल्या आहेत; परंतु त्याचे उल्लंघन होत असल्याने महापालिकेला कठोर निर्णय घ्यावे लागतील. - सतीश कुलकर्णी, महापौर 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT