private travel bus esakal
नाशिक

Nashik : प्रशासनाच्‍या मेहरबानीने रस्‍त्‍यावर फिरताय ‘जिवंत बॉम्‍ब’

अरुण मलाणी

नाशिक : क्षमतेपेक्षा जास्‍त प्रवाशांची वाहतूक, वेगमर्यादेचे उल्‍लंघन, प्रवासी वाहतूक बसमध्ये सर्रासपणे दुचाकीसह अन्‍य मालाची वाहतूक, सुविधांच्‍या नावाने वाढविलेली गुंतागुंत अशा विविध कारणांनी खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बसगाड्या धोकादायक बनल्‍या आहेत. सर्रासपणे उल्‍लंघन होत असल्‍याने, नियम केवळ कागदावरच राहता आहेत. चिरीमिरीमुळे शासकीय यंत्रणेकडून तपासणी होत नसल्‍याने प्रशासनाच्‍या मेहरबानीने रस्‍त्‍यावर जिवंत बॉम्‍ब फिरत असल्‍याची सध्याची स्‍थिती आहे.

एसटी महामंडळाच्‍या प्रवासभाड्याच्‍या तुलनेत खासगी ट्रॅव्‍हल्‍सकडून बऱ्याच वेळा कमी भाडे आकारले जाते. त्‍यामुळे चार पैसे वाचविण्याच्‍या प्रयत्‍नात प्रवाशां‍कडून खासगी ट्रॅव्‍हल्‍सद्वारे प्रवास केला जातो. प्रवासी वाहतुकीसंदर्भात सविस्‍तर नियमावली, कायदा अस्‍तित्‍वात असताना, प्रत्‍यक्षात मात्र या नियमांना तिलांजली दिली जात आहे. (Private travel buses become dangerous on roads ignorance of administration Nashik News)

याबाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली असल्‍याने प्रवाशांच्‍या जिवाशी खेळ सुरु आहे. चिरीमिरी मिळत असल्‍याने यंत्रणेकडून तपासणी होत नाही. यामुळे ट्रॅव्‍हल्‍स चालकांकडून बेकायदेशीर प्रकारांना खतपाणी घातले जाते आहे.

क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक नित्‍याचीच

स्‍लिपर कोच बसगाडीना तीस प्रवासी वाहतुकीची परवानगी आहे. परंतु प्रत्‍यक्षात मात्र ५० हून अधिक प्रवाशांची वाहतूक बसगाड्यांतून केली जाते. शनिवारी अपघातग्रस्‍त बसमध्ये तब्‍बल ५३ प्रवाशां‍ची वाहतूक करण्यात येत होती.

आसनी बसगाड्यांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. स्लिपर कोच वाहनात तीस प्रवासी व एक चालकासाठी परवानगी असल्‍याने, अतिरिक्‍त चालक किंवा क्लीनर ठेवला जात नाही. अशात अपघातानंतर अतिरिक्‍त ठरणाऱ्या प्रवाशां‍ना विम्‍याच्‍या लाभापासूनही वंचित राहावे लागू शकते.

दुचाकीपासून अन्‍य मालाची सर्रास वाहतूक

प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बसमधून प्रवाशांच्‍या लगेज व्‍यतिरिक्‍त व्‍यावसायिक दृष्टीने मालाच्‍या वाहतुकीस परवानगी नाही. असे असताना दुचाकी, कुरिअरचे पार्सल किंवा अन्‍य मालाची सर्रासपणे वाहतूक केली जाते.

यामुळे अपघातावेळी नुकसान होण्याची भीती अधिक राहाते. परवानगी घेताना बसवर कमाल वजनाची मर्यादा १६ टनापर्यंत असताना प्रत्‍यक्षात २५ ते २६ टनापर्यंत वजन राहात असल्‍याने गाड्यांची ब्रेकची यंत्रणा प्रभावित होऊन वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होते.

या गोष्टी बघणार कोण?

* चालकाच्‍या कामाचे तास अनिश्‍चित, बारा तासांपर्यंत चालक बजावतात ड्यूटी
* चालकांच्‍या प्रशिक्षणाची बोंब, आरोग्‍य तपासणीकडे दुर्लक्ष
* चालकांची व्‍यसनाधीनता ठरतेय अपघातांना आमंत्रण
* स्‍पीड गवर्नन्‍सची अंमलबजावणी नाहीच, वेगमर्यादेचे सर्रास उल्‍लंघन
* टप्पे वाहतुकीला परवानगी नसतांना नियमांकडे दुर्लक्ष
* एसी, चार्जर, टीव्‍हीच्‍या सुविधेमुळे शॉकसर्कीटचा वाढता धोका
* स्लिपर कोचला एसीची सक्‍ती, मात्र वातानुकूलित सिलींडरमुळे आगीचा भडका होण्याची भीती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT