Rain Update News
Rain Update News esakal
नाशिक

Nashik Rain Update : थोडाच वेळ बरसला, वातावरणात गारवा झाला..!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गेल्‍या काही दिवसांपासून तप्त उन्‍हाच्‍या झळा सोसत असलेल्‍या नाशिककरांना रविवारचा (ता. ४) दिवस काहीसा दिलासादायक राहिला. सकाळी अकराच्‍या सुमारास शहर परिसरात मॉन्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.

अचानक आलेल्‍या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. दरम्‍यान, दुपारनंतर तापमानात काही प्रमाणात घसरण झाली होती. नाशिकचे कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअसवर नोंदविले. (rain for short time atmospheric Presence of pre-monsoon rains in city rush of citizens Nashik Rain)

उन्‍हाळ्याचा तडाखा नाशिककरांना गेल्‍या काही दिवसांपासून अनुभवायला मिळत होता. नाशिकचे कमाल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत उंचावले होते.

यामुळे दिवसभर तप्त उन्‍हामुळे जनजीवन विस्कळित होताना, सायंकाळनंतरही उकाडा जाणवत होता. अशात रविवारी सकाळी दहापासून शहर परिसरात गर्द काळ्या ढगांनी आकाश व्‍यापले होते.

काही वेळातच ढगांच्‍या गडगडाटासह मॉन्‍सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या वेळी हवेचा वेग ताशी तीन ते चाळीस किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढलेला होता. अचानक आलेल्‍या पावसामुळे कामानिमित्त बाहेर असलेल्‍या नागरिकांची तारांबळ उडाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कमाल तापमानात घसरण..

जून महिन्‍याला सुरवात होत असताना गेल्‍या चार दिवसांपूर्वी १ जूनला नाशिकचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले होते.

यानंतर २ जूनला ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवार (ता.३) चे कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस होते.

रविवारी पावसाच्‍या हजेरीने पारा काही प्रमाणात घसरला असून, कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT