RPI with Hemant Godse esakal
नाशिक

CM Eknath Shinde Group : रिपाइं संघर्ष आघाडी मुख्यमंत्री शिंदे गटासोबत; रिपाइंत फूट!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र गटामुळे शिवसेनेत फूट पडली; पण आता रिपब्‍लिकन पक्षाच्या विविध गटांतही फूट पडली आहे. अनेक गटांतील पदाधिकारी एकत्र होउन त्यांनी रिपाइं संघर्ष आघाडी स्थापन केली आहे. जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षातील विविध गटांतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रिपब्लिक संघर्ष आघाडीच्या बॅनरखाली खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी असून, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. (Ripe Sangharsh Aghadi with Chief Minister Shinde Group break in RPI nashik news)

रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांतील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत पक्षीय पातळीवर आघाडी युतीबाबत संभ्रमावस्था असते, त्यातून पदाधिकाऱ्यांच्या राजकीय करिअरचा बळी जातो. पहिल्या फळीतील नेत्यांच्या भूमिकेमुळे दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचे सततच नुकसान होत आहे. परिणामी रिपाइं चळवळीचे मोठे नुकसान होत आहे.

नेत्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे रिपाइंच्या विविध गटांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी रिपब्लिकन संघर्ष आघाडीची स्थापना केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची वृत्ती भावल्याचे सांगत सोमवारी (ता. ९) खासदार हेमंत गोडसे यांची कार्यालयात भेट घेतली.

रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या बॅनरखाली भेटलेल्या या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे रिपाइं चळवळीची व्यथा मांडली. दुसऱ्या फळीतील नेत्यांमुळे असंतोषाचे वातावरण आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

यातूनच आम्ही रिपब्लिकन संघर्ष आघाडीची स्थापना केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात काम करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या नेत्यांनी दिली.

राज्यातील रिपाइंच्या विविध गटातील दुसऱ्या फळीतील नेत्यांची सविस्तर चर्चा करून आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा देणार असल्याची माहिती या वेळी आघाडीच्या नेत्यांनी खासदार गोडसे यांना दिली.

या नेत्यांमध्ये प्रकाश पगारे, मदन शिंदे,संजय रोकडे, भिवानंद काळे, सुनील कांबळे, दिलीप अहिरे, भरत रोकडे, किशोर गांगुर्डे, अतुल भावसार, संजय सानप, लढ्ढाभाई शेख आदी नेत्यांचा समावेश होता.

"रिपब्लिकन संघर्ष आघाडीच्या व्यासपीठाखाली जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील अनेक जुन्या नेत्यांनी सोमवारी भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांची काम करण्याची धडाडी, राज्याला पुढे नेण्याची तयारी तसेच सर्वसामान्य समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे तत्त्व मनाला भावणारे असल्याचे सांगत पाठिंबा दिला." - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT