Sanjay Raut News esakal
नाशिक

Sanjay Raut Statement : ‘समृद्धी’ च्या टक्केवारीने पक्ष उभा राहणार नाही

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या कामातून मिळालेल्या टक्केवारीच्या पैशांतून पक्ष उभा राहत नाही, असा शाब्दिक हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत खळबळ उडवून दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकला जाहीर सभा होत आहे. त्याची तयारी करण्यासाठी खासदार राऊत आज सायंकाळी नाशिकमध्ये आले. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांवर बोलावे असे महाराष्ट्रात भरपूर विषय आहे. (Sanjay Raut Taunting Statement on cm eknath shinde about samruddhi project in press meet Nashik News)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले व पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. या काळात मुख्यमंत्री कुठे होते? भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कधीच प्रेम नव्हते. त्यांच्या सत्ताकाळात महाराजांचा सातत्याने अपमान केला जातो.

कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केली जाते, तर कधी आक्षेपार्ह वक्तव्य करून मुद्दामहून वाद निर्माण केले जातात. भाजपच्या लोकांना मराठी साम्राज्याविषयी व छत्रपतींविषयी अजिबात प्रेम नाही. प्रेम आतून असावे लागते, तसे प्रेम असते तर राजभवनाच्या दाराला लाथा मारून आत जाऊन राज्यपालांना त्यांनी जाब विचारला असता, पण तसे केले नाही, भाजप हा ढोंगी लोकांचा पक्ष आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

शिवसेना महावृक्ष, उडाला तो कचरा

शहर शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर मुंबईत खासदार राऊत यांनी प्रतिक्रिया देताना जे गेले त्यांना येडेगबाळे संबोधले. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी त्यांना कचऱ्याची उपमा दिली. शिंदे गटाला कचरा गोळा करण्याची सवय आहे. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात.

पण शिवसेना हा महावृक्ष आहे. भरलेल्या वृक्षावरच लोक दगड मारतात. शिवसेनेची ताकद येत्या निवडणुकीत सर्वांनाच दिसेल. तेव्हा भेटू आणि बोलू. शिंदे गटात जाणारे लोक चोर-लफंगे आणि कचरा आहेत. कचऱ्याला आग लागते आणि नंतर धूर निघतो. शिंदे गटात जाणारे कोणीही परत निवडून येणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.

राणे, कुठे यायचे ते सांगा

राणे यांनी माझे नाव अजिबात घेऊ नये. त्यांच्या प्रकृतीसाठी ते चांगले नाही. मी त्यांचा कधीच एकेरी उल्लेख केला नाही. राणे हे एकेरी उल्लेख करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहे. राणे जशी भाषा वापरतात तसेच उत्तर त्यांना मिळेल. त्यांनी माझी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझे नाव संजय राऊत आहे, अशा शब्दांत त्यांनी दम दिला.

छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव चव्हाण यांचे आमच्यावर संस्कार आहेत. राणे हे गुंड आहेत, तर मी देखील महागुंड आहे. कुठे यायचे हे त्यांनी सांगावे, मी संरक्षणाविना तेथे येतो. मी कोणत्याही संकटाला सामोरे जायला तयार आहे. ईडीची नोटीस आली तरी मी गुडघे टेकले नाही. यापुढे देखील घाबरणार नाही, असे खासदार राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT