Sarvesh kushare won silver medal in high jump Asian Athletics Championship nashik news esakal
नाशिक

Success Story : सर्वेशने एशियन ॲथलेटिक्समध्ये उभारली यशाची ‘उंच’ गुढी!

सकाळ वृत्तसेवा

मनोहर बोचरे : सकाळ वृत्तसेवा

Success Story : बँकॉक (थायलंड) येथे सुरू असलेल्या पंचविसाव्या एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत उंच उडी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करीत देवगाव (ता. निफाड) येथील सर्वसामान्य कुटुंबातील सर्वेश अनिल कुशारेने रौप्यपदक मिळवत इतिहास घडविला आहे.

अतिशय छोट्या गावातील सर्वेशने सुरवातीला कोणत्याही सुविधा नसताना भुसा भरलेल्या पोत्यांची मॅट करीत त्यावर सराव केला.

अडचणी आल्या, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. पुढे सैन्यात भरतीनंतर तर त्याला मोठा आधारच मिळाला. (Sarvesh won silver medal in high jump Asian Athletics Championship nashik news)

सैन्यदलाचे प्रोत्साहन, आई-वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे सुयोग्य मार्गदर्शन आज सर्वेशला या उंचीवर घेऊन गेले आहे. आजच्या त्याच्या यशानंतर कुटुंबीयांसह शिक्षकांनी आनंद साजरा केला.

एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत सर्वेशने २.२६ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकले. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना त्याने हे यश प्राप्त केले. यापूर्वी नेपाळ (काठमांडू) येथे दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते. गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत २.२७ मीटर उंच उडी मारून त्याने आशियाई स्पर्धेची पात्रता गाठली होती.

अतिशय आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वेशने २.२६ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक आपल्या नावे केले. दरम्यान, राज्य शासनातर्फे कालच (ता. १४) सर्वेशला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याने एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला बहुमान मिळवून दिला, हा योगायोगच.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्वसामान्य कुटुंबातील सर्वेशचे शिक्षण देवगाव येथील डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. उंच उडीबद्दल त्याला पहिल्यापासूनच गती होती. ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नसताना बारदानी पोत्यांमध्ये मक्याचा भुसा भरून केलेल्या मॅटवर तो सराव करीत होता. खेळू नको, अभ्यास कर असे त्याचे आई-वडीलही त्याला कधी म्हटले नाहीत.

मॅट, स्पाइक यासह अन्य कोणत्याही प्रकारच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी त्याला प्रशिक्षण दिले. अखेर सर्वेशने अनेक अडचणींवर मात करीत सर्वांचे स्वप्न आज पूर्ण केले. क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव व भाऊसाहेब चव्हाण यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

आंतरशालेय उंच उडी खेळ प्रकारात राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होत त्याने पदके पटकावली. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवून सैन्य भरतीची तयारी सुरू केली.

त्याच्या या प्रयत्नाला २०१६ मध्ये यश आले. हैदराबाद येथे झालेल्या सैन्य भरतीत त्याची सैन्यात निवड झाली. त्याच्यातील क्रीडा कौशल्य वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला तेव्हापासून पूर्णवेळ खेळासाठी वेळ देण्यास परवानगी दिली. सैन्य दलाने दिलेल्या या पाठिंब्यानंतर सर्वेशने मागे वळून पाहिले नाही.

"ग्रामीण भागात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत. परंतु, त्यांना योग्य प्रशिक्षण व कुटुंबाचा पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक बाबी त्यांना अवगत व्हायला हव्यात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत, तरच ते खेळाला पूर्णवेळ देऊन देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात." - अनिल कुशारे, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT