fruit crop News esakal
नाशिक

Nashik News : फळबागांसाठी दीड लाखापर्यत अनुदान! ; नव्यांसह पुनरुज्जिवनाचीही संधी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतकऱ्याचे हित विचारात घेऊन विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविण्यासह जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषि विभागाकडून अनुदान देण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या बागांसाठी ५० हजार ते दीड लाखापर्यत अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या बागा फुलविण्यासह पुनरुज्जीवनासाठी संधी मिळणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. (Subsidy up to one and a half lakh for orchards Opportunity for revival in Agriculture department initiative for cultivation of exotic fruits spices Nashik News)

यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करणे तसेच जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.

अल्प भूधारक शेतकरी व इतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

फुले, लागवड अन अनुदान...

१) कट फ्लावर्स : अल्पभूधारक : रुपये १ लाख प्रति हेक्टर, इतर शेतकरी ः रुपये १ लाख प्रति हेक्टर

२) कंदवर्गीय फुले : अल्पभूधारक : रुपये १ लाख ५० हजार प्रति हेक्टर, इतर शेतकरी ः रुपये १ लाख ५० हजार प्रति हेक्टर.

३) सुटी फुले : अल्पभूधारक - ४० हजार रुपये प्रति हेक्टर, इतर शेतकरी ः ४० हजार हजार प्रति हेक्टर.

४) मसाला पीक : बियावर्गीय व कंदवर्गीय : ३० हजार रुपये प्रति हेक्टर. बहुवर्षीय मसाला पिके : ५० हजार रुपये प्रति हेक्टर.

५) विदेश फळपिक : ड्रगनफ्रुट : ४ लाख लाख प्रति हेक्टर. स्ट्रॉबेरी : २ लाख ८० हजार रुपये प्रतिहेक्टर. अवॅकॅडो : १ लाख रुपये प्रति हेक्टर.

६) जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन : ४० हजार हजार प्रति हेक्टर (एकूण खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत-जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Breaking News LIVE: मालवणी पोलिसांकडून नायजेरियन नागरिकाला ७२ लाखांच्या कोकेनसह अटक

Gold Price: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार, आश्चर्यकारक अहवाल समोर

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Pune News : कमला नेहरू रुग्णालयात २५ तज्ज्ञ डॉक्टरांची भरती; पगारात केली दुप्पटीने वाढ

Snake Bite : संर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचे वाचणार प्राण; ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट’ ठरणार जीवरक्षक

SCROLL FOR NEXT