theft of brass bell from temple along with an idol from Buddhist vihara nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : बौद्ध विहारातील मूर्तींसह मंदिरातील पितळी घंटांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सिन्नर शिर्डी महामार्गा लगत असलेल्या बुद्ध विहारातून पितळी धातूच्या 117 किलो वजनाच्या दोन मुर्त्या तसेच गावातील खंडोबा मंदिर देवी मंदिरातून तीन किलो वजनाच्या पितळी घंटा व समईची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. (theft of brass bell from temple along with an idol from Buddhist vihara nashik crime news)

पांगरी गावात असलेल्या बौद्ध विहारात रविवारी सकाळी कचरू बुधाजी निकम हे नियमित साफसफाई व मूर्तींची पूजा करण्यासाठी गेले असता बुद्ध विहारात असलेल्या भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुक्रमे ६७ व ५० किलो वजनाच्या पितळी मुर्त्या गायब असल्याचे आढळून आले.

त्यांनी तत्काळ बुद्ध विहाराच्या परिसरात राहणाऱ्या समाज बांधवांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना याबाबत माहिती देऊन मुर्त्यांची चोरी झाल्याचे सूचित केले. बुद्ध विहारातून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मूर्त्यांची चोरी केल्याने पांगरी परिसरात खळबळ उडाली. सरपंच स्मिता खरात, माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, जगन निकम, भास्कर निकम, काशीनाथ निकम, केतन निकम, पंडीत निकम यांचेसह ग्रामस्थांनी बौद्ध विहाराच्या परिसरात येऊन घटनेची माहिती घेतली.

याच दरम्यान गावातील खंडोबा मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिरात देखील पितळी घंटांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही मंदिरातून सुमारे अडीच किलो वजनाच्या पितळी घंटा व अर्धा किलो वजनाची पितळी समई चोरीला गेली. चोरीच्या या घटनांची माहिती महेश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बौद्ध विहारातून मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार घडल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक विजय सोनवणे हवालदार सतीश बैरागी यांनी तात्काळ धाव घेत पाहणी केली. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांना देखील कळवण्यात आले. निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी पांगरी येथे भेट देऊन पोलिसांना तपासकामी सूचना केल्या.

बुद्धविहार आणि गावातील मंदिरांमध्ये चोऱ्या एकाच रात्री झाल्याने नाशिक येथून श्वानपथक बोलावण्यात आले. या पथकाने शेजारच्या शिर्डी महामार्गापर्यंत माग काढला. तेथून चोरटे वाहनातून पळून गेले असावेत असा अंदाज आहे. परिसरातील गावांमध्ये तसेच महामार्गावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ची तपासणी देखील पोलिसांकडून करण्यात आली.

पोलिसांनी बौद्ध विहारातून चोरीस गेल्या पूजनीय मूर्ती तसेच गावातील खंडोबा मंदिर, देवी मंदिरातील चोरीला गेलेल्या घंटाचा तातडीने शोध घ्यावा. रात्रीच्या वेळी केवळ महामार्गावरून पोलिसांचे गस्ती वाहन धावते. गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून हे वाहन गावातून देखील फिरवावे अशी मागणी सरपंच सौ. स्मिता खरात यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT