Traffic jam at Malegaon Chauphuli on Indore-Pune highway.  esakal
नाशिक

Sakal Exclusive : इंदूर-पुणे महामार्गावर सततची वाहतूक कोंडी! लोकप्रतिनिधी, पोलिस आणि पालिकेने करावे नियोजन

अमोल खरे

Sakal Exclusive : मनमाडमधून गेलेल्या इंदूर-पुणे महामार्गावरील मालेगाव चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यासाठी नियमांचे उल्लंघन, वाहनांची वाढती संख्या, विकासकामे, वाहतूक पोलिसांची कमतरता यांसारखी अनेक कारणे आहेत.

ही समस्या सर्वसामान्यांशी निगडित असल्याने याबाबत लोकप्रतिनिधी, पोलिस आणि पालिकेने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

इंदूर-पुणे महामार्गावर मालेगाव चौफुली आहे. या चौफुलीवर मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव असे चार मार्ग जोडले असल्याने वाहतुकीचा भार या चौफुलीवर पडतो. (Traffic jam at Malegaon Chaufuli on Indore Pune highway nashik news)

इंधन टँकर, धान्याचे ट्रक, कांद्याचे ट्रॅक्टर या वाहतुकीचा भार याच मार्गावर आहे. अवजड वाहनांची मोठी वर्दळ या मार्गावर आहे. त्यात चारही बाजूंनी येणारी वाहने ही चौफुलीच्या वळणावर वळत असताना काही वाहनधारकांकडून वाहने बेशिस्तपणे मध्ये घुसवली जातात, तर अवजड वाहनांनी रस्ता ब्लॉक होतो.

अनेकदा रस्त्यांचे विकासकाम सुरू असल्याने एकेरी वाहतूक केली जाते. यामुळे अनेकदा वाहतूक धीम्यागतीने एका बाजूने सुरू असल्यास कोंडी होते. या महामार्गाला शहराबाहेरून बायपास नसल्याने नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. रस्ता नवा झाल्याने विनाअडथळा जाण्यासाठी वाहनांची सोय झाली आहे.

परंतु या मार्गावर पायी चालणाऱ्यांना पादचारी मार्ग नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन या राष्ट्रीय मार्गावरून ये-जा करावी लागते. अपघात होण्याची भीती कायम असते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा अपघात घडले आहेत.

वाहतूक सुरळीत करताना शहर पोलिसांच्या नाकीनऊ येतात. वाढती वाहनसंख्या या समस्यांत दिवसेंदिवस भर घालत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी झाली आहे. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांनी लक्ष देणे तसेच वाहनधारकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे.

अंतर्गत रस्त्यांचा श्वास गुदमरतोय

शहराच्या अंतर्भागातील रस्ते अरुंद असल्याने अनेकदा कोंडी होत असते. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे इतर वाहने पास होत नसल्याने वाहतूक कोंडी होते. रेल्वेस्थानक, डॉ. आंबेडकर पुतळा, इंडियन हायस्कूल, नेहरू रोड, पालिका ते नगिना मजीद, पालिका ते पाकिजा कॉर्नर या रस्त्यांवर बेशिस्तपणे गाड्या लावल्याचे चित्र दिसून येते. मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांचा श्वासही यामुळे गुदमरतो आहे.

वाहतूक व्यवस्थेकडे पोलिसांचे हवे लक्ष

पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेकडे थोडे लक्ष द्यावे, ही माफक अपेक्षा मनमाडकरांची आहे. वाहतूक सुरळीतपणे चालावी, याकडे कोणीही का लक्ष पुरवत नाही, हे सामान्य मनमाडकरांना न सुटणारे कोडे झाले आहे. अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या यामुळे मालेगाव चौफुली अथवा शहरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी दिसून येते. पोलिस ठाणे वाहतूक विभागाच्या नियोजनाअभावी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

"इंदूर-पुणे मार्गावर खास करून मालेगाव चौफुलीवर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक हैराण झाले आहेत. वाहनाच्या रांगा लागल्यावर पोलिस नसतात. अनेकदा बराचवेळ थांबावे लागते. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक होणे गरजेचे आहे." - गिरीश देवरे, मनमाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT