trees plantation
trees plantation esakal
नाशिक

Tree Plantation : योग्य ठिकाणी, योग्य वृक्षांची लागवड काळाची गरज!

सकाळ वृत्तसेवा

"पावसाळा जवळ आलाय आता बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होणार. ही एक चांगलीच आणि सकारात्मकच गोष्ट आहे. पण वृक्षारोपण करण्याआधी घाईगडबड न करता काही गोष्टी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

बऱ्याच लोकांचा कल भरभर वाढणाऱ्या विदेशी वृक्षांकडे असतो. त्यांच्या लागवडीमुळे नेमका काय परिणाम होतो, हे नीट समजून घेणे गरजेचे. त्यामुळे जरा थांबा आधी समजून घ्या मग वृक्षारोपणाचे आपले आराखडे बांधा.

काहींच्या मते, झाड झाड असते, ते देशी असो की विदेशी असो. म्हणूनच हे सांगण्याची गरज येते, की देशी वृक्ष आणि विदेशी वृक्ष लागवडीमुळे नेमके काय होते ते. देशी व प्रदेशनिष्ट वृक्षांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे." - शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था.

(tree plantation Need of time to plant right trees in right place nashik news)

देशी व प्रदेशनिष्ट वृक्ष, हे तेथील पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी अबाधित राखण्यासाठी आपल्या प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार महत्त्वाचे आहे. लागवड करताना त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

त्या, त्या भागातील भौगोलिक व वातावरणाच्या अनुसार प्रदेशनिष्ट वृक्ष लागवडीमुळे तेथील त्याच्यावर अवलंबून असलेले उपयुक्त असे पर्यावरणीय घटक म्हणजेच, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, मित्र कीटक, इतर काही घटक जसे उपयुक्त बुरशी, सूक्ष्म कीटक यांच्यासाठी अन्न, निवारा चे पोषक वातावरण तयार होते.

तसेच त्यांच्या मुळांमुळे त्या ठिकाणच्या जमिनीतील पर्यावरणीय घटकांना पोषक वातावरण मिळून त्यांची उत्पत्ती वाढण्यास मदत होते. असल्या काही सूक्ष्म कीटकांचा जीव जंतूंचा जे आपल्या नजरेस पडत नाही. पण ते त्यांचं काम करत, तेथील मातीचा पोत वाढविण्यासाठी, मदत करत असतात. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा पण चांगला होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जमिनीतील पाण्याचा स्तर वाढण्यास मदत होते. देशी वृक्ष, आपल्या पारंपरिक रानमेव्याचा एक मोठा स्रोत आहे. आपल्या देशी वृक्षांचे जो काही पालापाचोळा जमिनीवर पडतो त्याचे विघटन पटकन होऊन तेथील जमिनीचे पोषक घटक वाढण्यास मदत होते.

आपले देशी वृक्ष हे शेती उपयुक्त, शोभिवंत, आपल्या पर्यावरणातील परिसंस्थेची साखळी अबाधित राखण्यासाठी व तसेच आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचे, असे सर्व गुणधर्म असलेले आहेत.

गुलमोहर, रेनट्री, आकेशिया, निलगिरी, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, स्पेतोडीया, पेलट्राफोरम, खाया, कायझेलीया पिनाटा, ट्यॉबोबीया व इतर असे ९० टक्के विदेशी वृक्ष हे जगभरातील विविध अतिउष्ण भागातून आलेले आहेत. त्यामुळे इथल्या पोषक जमिनीमध्ये ते पटकन वाढतात. जेवढे पटकन वाढतात, तेवढेच ते ठिसूळ पण आहेत.

आपल्या वातावरणातील पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी अबाधित राखण्यास असक्षम आहेत. मधमाशी, फुलपाखरू, पक्षी, मित्र कीटक व इतर उपयुक्त घटकासाठी पोषक वातावरण निर्माण करत नाहीत.

यांची मुळ पण आपल्या येथील जमिनीचा पोत खराब करतात व जमिनीतील पाण्याची पातळी घटवतात. यांच्यावर वाढणारे शत्रू कीटक, आपल्या वनसंपदा व शेतीसाठी घातक परिस्थिती निर्माण करतात.

यांच्या वाळलेल्या पानाचे लवकर विघटन होत नाही. जमिनीत पावसाचं पाण्याचा निचरा होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोचवते. त्यामुळे तेथील पाण्याचा स्तर पण बिघडतो. जसे भूक लागली म्हणून आपण नेहमीच काही पण खाऊन पोट भरल्यास, पोट नक्कीच बिघडणार व पोषक खाल्यास आरोग्य छान राहणार.

तर तसेच काहीसे थोडक्यात, नुसती पटकन हिरवळ दिसण्यासाठी विदेशी वृक्ष लागवड केल्यास तेथील वातावरण बिघडणार. असे आहेत परिणाम व दुष्परिणाम देशी व विदेशी वृक्ष लागवडीचे. तर चला आता आपण वृक्ष लागवड करताना ‘योग्य ठिकाणी, योग्य वृक्षांची लागवड ही काळाची गरज’ हे ब्रीदवाक्य मनात ठेवून काम करूयात. वृक्ष लागवडीची संख्या महत्त्वाची नसून त्याची गुणवत्ता विचारात घेणे गरजेचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT