crime esakal
नाशिक

Nashik Crime : मालेगावला व्याघ्रंबरी देवी मंदिरात चोरी; 24 तासात गुन्ह्याची उकल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील कॅम्प भागातील सोनार गल्लीतील व्याघ्रंबरी देवी मंदिरात चोरीचा प्रकार घडला.

चोरट्यांनी दानपेटी, चांदीच्या देवीच्या चरण पादुका असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याने खळबळ उडाली होती. कॅम्प पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज व तपास करत अवघ्या २४ तासात या चोरीचा छडा लावला आणि दोघा संशयितांना अटक केली. (Two suspects arrested in Vyaghrambari Devi temple theft case nashik news)

कॅम्पातील सोनार गल्ली भागातील मंदिरातील मेनगेटची लोखंडी साखळी व कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली दानपेटी, त्यातील पैसे, दानपेटीस लावलेल्या चांदीच्या चरण पादुका चोरुन नेल्या. शनिवारी (ता. १३) सायंकाळी हा प्रकार घडला.

मोरे (वय ४६, रा. थोरात गल्ली, कॅम्प) यांनी या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. मंदिरातील चोरी असल्याने कॅम्प पोलिसांनी तिचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तसेच पोलिसांच्या गुप्त बातमीदारांमार्फतही त्यांना काही माहिती मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाचे चक्र फिरवून राहुल ननावरे (२०, रा. निळगव्हाण फाटा, भायगाव शिवार) व अजय परदेशी (२०, मोतीबाग नाका, नवी वस्ती) यांना रविवारी अटक केली. चौकशीत चौघा तरुणांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोघांकडून दानपेटी, चरणपादुका व काही ऐवज जप्त केला आहे. तिसऱ्या संशयितासही पोलिसांनी अटक केली असून चौथ्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Latest Marathi News Live Update: मुंबईत तीन दिवस पाणी कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT