A police drill ground cleared for the main prayers of Ramadan Eid  esakal
नाशिक

Ramdan Eid 2023 : बोनस मिळाल्याने यंत्रमाग कामगारांना ईद गोड; मालेगावात खरेदीसाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यंत्रमाग व खासगी आस्थापनावरील लाखो कामगारांना ईदचा बोनस मिळाल्याने शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांनी सणानिमित्त खरेदीसाठी पुर्व भागातील हजारो दुकानांवर तोबा गर्दी उसळली आहे. (Workers at looms have received Eid bonuses nashik news)

किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, सरदार चौक, पेरी चौक, भिक्कू चौक, भंगार बाजार, मच्छी बाजार आदी भागात तर दुचाकी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली. यंत्रमाग व पाइप कारखान्यातील कामगार, तसेच खासगी दुकाने व आस्थापनांवरील कामगारांना कमी-अधिक प्रमाणात बोनसचे वाटप करण्यात आल्याने यावर्षी ईदचा शिरखुर्मा अधिक गोड होणार आहे. ईदच्या पाश्‌र्वभूमीवर सामूहिक नमाज पठणासाठी पोलिस कवायत मैदानाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे.

मालेगाव शहरात दीड लाखावर यंत्रमाग कामगार आहेत. पाइप कारखाने तसेच खासगी दुकाने व आस्थापनांवर लाखो कामगार काम करतात. येथे रमजान ईदला बोनस देण्याची प्रथा आहे. गेल्या दोन दिवसापासून बोनसचे वाटप केले जात आहे. शासकीय नियमानुसार हक्क रजेचा पगार व बोनस देणे बंधनकारक आहे.

यंत्रमागाची परिस्थिती पाहता अनेक कारखान्यांमध्ये मालक व कामगारांमध्ये समन्वय आहे. त्यामुळे तीन हजारांपासून सात हजारापर्यंत बोनस देण्यात आला. तसेच सणासाठी उचलही देण्यात आली. कष्टकऱ्यांच्या हातात पैसा आल्याने ईदच्या खरेदीची खऱ्या अर्थाने धूम सुरु झाली आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ईदच्या खरेदीत तयार कपडे, चप्पल, बूट, मोजे, कमरेचे बेल्ट, शर्ट, पॅन्ट, अंडरवेअर, बनियन, लुंगी, रुमाल, गोल टोपी, अत्तर, मेहंदी, सौंदर्य प्रसाधने आदींबरोबरच शिरखुर्माचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. विशेषतः महिला मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.

चांदरातच्या खरेदीसाठी किदवाई रोड सज्ज झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा तसेच मध्यभागी दोन्ही बाजूला सातशेपेक्षा अधिक हातगाडीवरील दुकाने लावण्यात आले आहेत. खासगी दुकाने व आस्थापनांवरील कामगारांनाही दोन ते पाच हजारापर्यंत ईदचा बोनस देण्यात आला आहे. विविध सामाजिक संस्था व दानशुरांकडून गरिबांना कपडे व खाद्यपदार्थ वाटप केले जात आहेत.

मैदानांची स्वच्छता

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण अवघ्या दोन दिवसावर आला आहे. शुक्रवारी (ता.२१) चंद्रदर्शन झाल्यास शनिवारी (ता.२२) ईद होईल. तसेच शनिवारी चंद्रदर्शन झाल्यास रविवारी (ता.२३) ईद होईल.

ईदचे मुख्य नमाज पठण येथील राष्ट्रीय एकात्मता चौकाजवळील पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल नमाज पढवतील. पोलिस कवायत मैदान स्वच्छ करण्यात आले आहे. या भागातील चहा दुकाने, पान टपऱ्या, कुशन विक्रेते व इतर खाद्य पदार्थांची दुकाने हटविण्यात आली.

रमजान ईद व अक्षयतृतीया सणाच्या पाश्‍र्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून ईदच्या नमाज पठणासाठी विविध मैदानांची स्वच्छता करण्यात आल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT