Onion is rotting due to low price dhule news 
उत्तर महाराष्ट्र

Dhule Onion News : भावाअभावी चाळीत सडतोय कांदा; नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Onion News : केंद्र सरकारचे शेतीबाबत ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांच्या मालाची माती होत आहे. कांद्याचा भावाअभावी नेहमीच वांधा होत चालला आहे. कांदा हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. पाहिजे तेव्हा कांद्याचे भाव पाडून, निर्यातशुल्क वाढवून, शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम संबंधित यंत्रणा करीत आहे. (Onion is rotting due to low price dhule news)

आताही निर्यातशुल्क प्रचंड वाढवून कांद्याचा वांधा झाला आहे. अधिक भाव मिळेल या अपेक्षेने उन्हाळ्यापासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. उकिरड्यावर फेकला जात आहे. आता तरी सरकार धोरण बदलेल का, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

चाळीस टक्के निर्यातशुल्क

केंद्र सरकारने कांद्याचे भाव वाढू लागल्याने ४० टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. यामुळे परदेशात होणारी निर्यात जवळजवळ थांबालीच आहे. या निर्यातशुल्कामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे.

देशांतर्गत भाव वाढू नये म्हणून शासन पाहिजे तेव्हा निर्यातशुल्क अवाजवी वाढवीत असते, यामुळे नेहमीच कांद्याचा वांधा होत असल्याचे शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील यांनी सांगितले.

उन्हाळ कांद्याला पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगल्यापैकी भाव मिळतो म्हणून धुळे जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी चाळीत कांदा साठवीत असतात. या वर्षीही मोठ्या प्रमाणात साठविला आहे. मात्र त्यास निर्यातशुल्काचा फटका बसला आहे. भाव नसल्याने कांदा चाळीतच सडत आहे. मजूर लावून त्यास निवडले जात आहे. उकिरड्यावर फेकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

नाफेड खरेदी केंद्र सुरू करा

धुळे जिल्ह्यात कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडचे एकही खरेदी केंद्र सुरू नाही. ते सुरू करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी संभाजी पाटील, नारायण माळी, राजेंद्र माळी, भगवान पाटील, विश्वासराव देसले, शालिग्राम पाटील, प्रशांत पाटील, महेंद्र पाटील, राजा पाटील आदी शेतकऱ्यांकडून होत आहे.

"दर वर्षी चाळीत कांदा साठवितो. पावसाळ्यात योग्य भाव मिळतो. निर्यातशुल्क वाढविल्याने भाव पडले आहेत. शासनाने निर्यातशुल्क शून्य करावे." -संभाजी पाटील, कांदा उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT