Corona Vaccine esakal
उत्तर महाराष्ट्र

Covid Vaccination News : एक परत, दुसरी शिल्लक नाही, तिसरी ‘एक्स्पायरी’ कडे...!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा नव्याने उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र, राज्य शासनाने देशभरात दक्षतेसह उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. यात कोविड लसीकरणावरही प्रामुख्याने भर आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कोविड लसीकरणाची स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसते.

विशेषतः बूस्टर डोसबाबत प्रचंड उदासीनता आहे. या उदासीनतेमुळे ‘कॉर्बोव्हॅक्स' लशीचे तब्बल दहा हजार डोस महापालिकेला परत पाठवावे लागले आहेत. दुसरीकडे आता ‘कोव्हीशिल्ड' लस शिल्लकच नाही तर ‘कोव्हॅक्सीन’चा साठाही एक्स्पायरी डेटच्या उंबरठ्यावर आहे. (Status of covid vaccines Minimal response of citizens to booster dose dhule news)

कोरोना विषाणू संसर्गाने गेली दोन-अडीच वर्ष संपूर्ण जग हैराण झाले. यातून दिलासा मिळाल्यानंतर संपूर्ण जनजीवन, व्यवहार, उद्योग-व्यवसाय सुरळीत सुरू झाले. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. मात्र, प्रामुख्याने चीन व इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र, राज्य शासनाकडून शासकीय यंत्रणेला दक्षता बाळगण्याचे, उपाययोजनांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेतर्फेही महापौर प्रदीप कर्पे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत विविध सूचना, निर्देश दिले आहेत. नागरिकांना कोविड लसीकरणासाठीही आवाहन केले आहे. कोविड लसीकरणावर नजर टाकली तर धुळे शहरातील स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचेच चित्र आहे. विशेषतः बूस्टर डोसबाबत मोठी उदासीनता आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

बूस्टरला अल्प प्रतिसाद

कोविड लसीकरणाअंतर्गत विविध वयोगटातील लाभार्थ्यांना पहिला, दुसरा डोस देण्यात आला. त्यानंतर बूस्टर डोसचीदेखील कार्यवाही सुरू झाली. हा बूस्टर डोस घेण्यासाठी मात्र धुळे शहरात नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत केवळ ३२ हजार ८८२ लाभार्थ्यांनीच बूस्टर डोस घेतला आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचेदेखील शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. पहिल्या डोसचे ७६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ६१ टक्के लसीकरण आहे.

दहा हजार डोस परत

कोविड लसीकरण मोहिमेत ज्या लाभार्थ्यांनी जी लस घेतली असेल त्याच लशीचा दुसरा व बूस्टर डोस (कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन) घेण्याबाबत निर्देश होते. नंतरच्या काळात बूस्टर डोससाठी कॉर्बोव्हॅक्स लशीला परवानगी देण्यात आली. अर्थात पहिले दोन्ही डोस कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीनचे घेतले असतील तरी अशा लाभार्थ्यांना कॉर्बोव्हॅक्सचा बूस्टर डोस देण्यात येत होता. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्याने त्यांनी कॉर्बोव्हॅक्स लशीच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरविली. परिणामी धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कॉर्बोव्हॅक्स लशीचे तब्बल दहा हजार डोस शासनाकडे परत पाठवावे लागले.

कोव्हॅक्सीन उपलब्ध पण...

सद्यःस्थितीत महापालिकेकडे कोव्हीशिल्ड लस उपलब्धच नाही. या लशीसाठी महापालिकेचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. दुसरीकडे कोव्हॅक्सीन लशीचे दहा हजार डोस महापालिकेकडे उपलब्ध आहेत. मात्र लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद नाही. शिवाय शिल्लक कोव्हॅक्सीन लशीची मुदत (एक्स्पायरी) जानेवारी-२०२३ मध्ये संपत आहे. त्यामुळे तत्पूर्वी या लशी उपयोगात आल्या नाहीत तर त्याही परत पाठवाव्या लागतील अशी स्थिती आहे.

लसीकरणाची स्थिती अशी

एकूण अपेक्षित लाभार्थी......३,७३,४४८

पहिला डोस...................२,८५,४७६

दुसरा डोस.....................२,२६,५८०

बूस्टर डोस.......................३२,८८२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT