Sakri: New Sagar Sweets shop was completely gutted by fire in the night. esakal
उत्तर महाराष्ट्र

Fire Accident News : मिठाईच्या दुकानाला साक्रीत आग; 30 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील महामार्गलगत असलेल्या न्यू सागर स्वीट्स हे खाद्यपदार्थ व मिठाईचे दुकान रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णत: जळून खाक झाले. यात सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नैनाराम रामजी चौधरी (रा. राजस्थान) यांचे हे दुकान गेल्या सहा वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे. गुरूवारी (ता. १) मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Sweet shop caught fire in Sakri Estimated loss of 30 to 35 lakhs Fire Accident Dhule News)

इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सुरवातीला सांगण्यात येत असले, तरी आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगीस सुरवात झाल्यानंतर या ठिकाणी असलेले फर्निचर, स्वयंपाकाच्या गॅसमुळे आग वाढून पूर्ण दुकान जळून खाक झाले.

दुकानातील सर्व साहित्य, खाद्यपदार्थ, रोख रक्कम, फ्रिज व अन्य साहित्य असे एकूण ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुदैवाने नेहमी दुकानाच्या मागील बाजूस झोपणारे कामगार गुरूवारी बाजूच्या दुकानाच्या छतावर (स्लॅबवर) झोपले होते. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अग्निशमन बंब पोचला उशिरा

या दुकानाच्या एका बाजूला शिंदे हॉस्पिटल, तर दुसऱ्या बाजूला अहिरराव हॉस्पिटल आहे. आगीची घटना सर्वप्रथम दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या डॉ. विजया अहिरराव यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने नगरपंचायतीत अग्निशामक बंब पाठवण्याबाबत कळविले.

मात्र, अग्निशामक बंबचा चालकच उपस्थित नसल्याने तो वेळेत पोचू शकला नाही. त्यानंतर त्यांनी नगरसेवक सुमित नागरे यांना कळवल्यावर त्यांनी व माजी नगरसेवक बाळा शिंदे यांनी तत्परतेने एका चालकाला आणून बंब घटनास्थळी आणला.

घटनेनंतर सुमारे एक-दीड तासांनंतर बंब आल्याने तोपर्यंत आग आणखी भडकली. दरम्यान, डॉ. अहिरराव यांनी याबाबत महावितरण विभागालादेखील कळवले. त्यावर महावितरणचे कर्मचारी शरद धनगर यांनी तत्परतेने या भागातील वीज पुरवठा तात्पुरता खंडित केल्याने अन्य ठिकाणी आग पसरली नाही.

फायर ऑडिट गरजेचे

या घटनेच्या अनुषंगाने सर्वच दुकाने व सार्वजनिक ठिकाणचे फायर ऑडिट गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

शहरातील अशा अनेक दुकानांमध्ये सुरक्षिततेच्या कुठल्याही उपाययोजना दिसून येत नाहीत. यामुळे आगीसारख्या घटना घडून सर्वांनाच याचा धोका संभवतो.

अशावेळी नगरपंचायतसह प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करून फायर ऑडिट व सुरक्षिततेच्या उपाययोजना आहेत की नाही हे तपासणे, तसेच नसल्यास संबंधितांवर कारवाई करणे देखील गरजेचे बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT