pesa certificate esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आदिवासी कल्याणाचा ‘पेसा’ कागदावर

पेसा क्षेत्रांतर्गत राज्यातील १३ जिल्हे आणि ५९ तालुक्यांना समन्वयक नियुक्त केले नसल्याने तीन हजार आदिवासीबहुल ग्रामपंचायती क्षेत्रात हा कायदा कागदावर राहिल्याचा सूर आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पुरेसे समन्वयक नसल्याने आदिवासींचे स्वयंशासन निर्माण करणारा आणि १९९६ मध्ये लागू झालेल्या ‘पेसा’ (पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया) कायद्याची खानदेशात २५ वर्षांनंतरही प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पेसा कक्ष कार्यान्वित केला.

मात्र पेसा क्षेत्रांतर्गत राज्यातील १३ जिल्हे आणि ५९ तालुक्यांना समन्वयक नियुक्त केले नसल्याने तीन हजार आदिवासीबहुल ग्रामपंचायती क्षेत्रात हा कायदा कागदावर राहिल्याचा सूर आहे. (The Pesa law of tribal welfare is only on paper dhule news)

‘पेसा’अंतर्गत खानदेशात धुळ्यासह नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील काही तालुके पूर्णत:, तर सात तालुके अंशत: अंतर्भूत आहेत. पेसा कायदा १९९६ मध्ये पारित झाला. राज्याने २०१४ मध्ये या कायद्याचे नियम बनविले. जिल्हास्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केले.

पुणे येथे पेसा कक्ष स्थापन केला. कक्षासाठी आठ तसेच राज्यातील नगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर व गडचिरोली हे १३ जिल्हे आणि याअंतर्गत ५९ तालुक्यांसाठी प्रत्येकी एक असा ८० कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर आहे. पण, प्रत्यक्षात जागा भरल्या गेल्या नाहीत.

महाराष्ट्र एकमेव

राज्यातील दोन हजार ९९१ पेसा ग्रामपंचायतींना ५ टक्के विशेष निधीतून दर वर्षी २७६ कोटी निधी प्राप्त होतो. अशा स्वरूपाची योजना लागू करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. या योजनेमधून पेसा गावांचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामस्थांना पेसा कायद्याची आणि आपल्या हक्काची माहिती नाही.

त्यात शासनाने मनुष्यबळ दिले नाही. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या भरवशावर पेसाची कशीबशी अंमलबजावणी सुरू आहे. मनुष्यबळ अपुरे असले तरी सरकारी काम सुरू असते. पेसा क्षेत्रातील ५९ तालुके आणि १३ जिल्ह्यांसाठी कंत्राटी स्वरूपात समन्वयक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खानदेशातील पेसा स्थिती

खानदेशात अंशत: तालुक्यांतील एकूण ४२४ ग्रामपंचायती पेसा क्षेत्रात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी या चार तालुक्यांचा पूर्णत: पेसात अंतर्भाव आहे. नंदुरबार तालुक्यातील ८२ व शहादा तालुक्यातील १४१ गावे पेसात मोडतात.

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील ८० व शिरपूर तालुक्यातील ६२ गावे पेसा क्षेत्रात येतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात २५, यावल १३ व रावेर तालुक्यातील २१ गावे ‘पेसा’अंतर्गत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT