Dhule: Zilla Parishad President Ashwini Patil and other office bearers attended the Zilla Parishad meeting to resolve the possible water shortage
Dhule: Zilla Parishad President Ashwini Patil and other office bearers attended the Zilla Parishad meeting to resolve the possible water shortage esakal
उत्तर महाराष्ट्र

Water scarcity Meeting : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडा : अश्‍विनी पाटील

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पांझरा नदीकाठी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या २९ गावांमध्ये मेअखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांसाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी दिला.

तसेच धुळे तालुका टँकरमुक्त राहील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्धार पदाधिकारी व प्रशासनाने व्यक्त केला.

धुळे तालुक्यातील गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ मंगळवारी (ता. १६) जिल्हा परिषदेत आढावा बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. (Water scarcity meeting Ashwini Patil statement Release water from Akkalpada project Suggestions of measures including acquisition of wells Dhule News)

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, पंचायत समिती सभापती वंदना मोरे, प्रभारी गटविकास अधिकारी सत्यम गांधी, तहसीलदार गायत्री सैंदाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता जयश्री सारवे, माजी कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, संग्राम पाटील, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य तुषार महाले, सुभाष पाटील, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कोल्हे, पुरवठा विभागाचे उपअभियंता संजय पढ्यार, कनिष्ठ अभियंता जयदीप पाटील यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर

अध्यक्षा पाटील यांनी धुळे तालुक्यातील कुठल्याही गावाला तीव्र पाणीटंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आपणास मार्ग काढायचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुरमेपाडा, सैताळे, कापडणे, न्याहळोद, विसरणे, फागणे, सातरणे येथे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची बाब समोर आल्यानंतर ही अडचण दूर करण्यासाठी पुरमेपाडा व सैताळे येथे स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा मुद्दा पुढे आला. ही समस्या निकाली काढण्यासाठी वीज वितरण कंपनी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांची २४ मेस संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गावांना पाणी सोडणार

अक्कलपाडा धरणात आरक्षित पिण्याच्या पाण्याचे प्रथम आवर्तन सुमारे ३२० दशलक्ष घनफूट पाणी पांझरा नदीपात्रात सोडण्याची २९ गावांसाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मांडळ, दोंदवाड, विंचूर, बोरकुंड, रतनपुरा गावांमध्ये टंचाई भासू नये म्हणून मांडळ लघु प्रकल्पातील आरक्षित पाणी सोडण्यात येणार आहे.

विहिरींचे अधिग्रहण

उभंड येथे विहीर अधिग्रहण करण्यात आली असून, धमाने, नावरी, नवलनगर, सावळी तांडा येथील प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच जुने बाबरे, तांडा कुंडाणे, कुंडाणे-वेल्हाणे, नवलाणे, निकुंबे, जुनवणे, सरवड या संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाई विशेष कृती आराखड्यात धुळे तालुक्यातील २१ गावांचा समावेश आहे.

वीजपुरवठा तोडू नका

संभाव्य पाणीटंचाईचे संकट असताना पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन खंडित करण्यात येत असल्याची तक्रार वडगाव येथील ग्रामसेविकेने केली. याबाबत अध्यक्षा पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने वीज कनेक्शन खंडित करू नये, अशी सूचना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुचे व्यसन अन् ED मागे लागलेल्या नेत्याला निवडून देऊ नका; अण्णा हजारेंचा केजरीवालांवर बोचरा वार

Pune Crime News : बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही तर पुण्यात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावाच्या सचिव पदाची पोस्ट रिक्त, नीना गुप्तांनी मागवले अर्ज, पोस्ट चर्चेत

KKR: 'माहीभाईचं घर दिसतंय का?' रांचीवरून विमान जात असताना उत्साही वेंकटेश अय्यरचा प्रश्न, Video होतोय व्हायरल

Fashion Designing Course : परदेशात जाऊन शिकायचंय Fashion Designing? तर या आहेत बेस्ट युनिव्हर्सिटीज

SCROLL FOR NEXT