fight woman molestation.jpg 
उत्तर महाराष्ट्र

''तुझ्या मोबाईलमध्ये माझ्या मुलीचे फोटो कसे?' मुलीच्या वडिलांनी विचारल्यावर राग झाला अनावर...अन्

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साकोरा (ता. नांदगाव) येथे एका मुलीची छेडछाड केली म्हणून संबंधित तरुणाला दारू पाजून जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत परस्परविरोधी एकूण सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. 

"तुझ्या मोबाईलमध्ये या मुलीचे फोटो कसे आले', असे विचारले. यावर,

फिर्यादी जखमी समाधान जाधव याने दिलेल्या तक्रारीत संशयित विजय शिंदे याने समाधान यास दारू पिण्यासाठी वेहळगाव रस्त्यावरील गॅस गुदामाजवळ घेऊन नेले. त्याठिकाणी मद्यपान करताना शिंदे हा बाजूला जाऊन फोनवरून बोलताना संबंधित मुलीचे वडील राजेंद्र जाधव, अनिल वाघचौरे, सागर, तसेच संबंधित अल्पवयीन तरुणीला त्या जागेवर बोलवून घेतले. त्यानंतर सर्वांनी फिर्यादी समाधान यास विचारपूस करताना, "तुझ्या मोबाईलमध्ये या मुलीचे फोटो कसे आले', असे विचारले. यावर, तिनेच मला पाठविल्याचे सांगितल्याचा सर्वांना राग आल्यावर त्यांनी फिर्यादिस पुन्हा छेडछाड केली तर ठार मारून टाकू, असे सांगत लोखंडी वस्तूंच्या सहाय्याने, तसेच लाथा-बुक्‍क्‍यांनी जोरदार मारहाण केल्याचे पोलिस तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

त्यानंतर ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचार करून त्याला मालेगावला हलविण्यात आले आहे. याच घटनेतील फिर्यादी पीडित मुलीने समाधान जाधवने आपली छेड काढल्याचे म्हटले आहे. याच कारणाने गतवर्षी दोन्ही गटांत वाद झाला होता. यासंदर्भात नांदगाव पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक चौघुले पुढील तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway : विकेंडला ३०० लोकल रद्द! पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, वाचा कधी आणि का?

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन

आलिया, अनन्या पेक्षाही जास्त मानधन घेते श्रद्धा कपूर; मुलीबद्दल शक्ती कपूर बोलले ते खरं आहे का? हे आहे सत्य

TET Result 2025 : टीईटी निकालाची तारीख ठरली? उत्तरसूचीवर हरकतीसाठी शेवटची संधी; साडेतीन लाख उमेदवारांची प्रतीक्षा संपणार

Morning Skincare Routine Tips: सकाळी सगळ्यात आधी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायचं की मॉइश्चरायझर? जाणून घ्या स्किनकेअर रूटीन टिप्स

SCROLL FOR NEXT