akola 37 positives in one day,The corona reached the affected two and a half hundred, increasing danger day by day 
विदर्भ

बापरे! एकाच दिवशी 37 पॉझिटिव्ह, कोरोना बाधीत पोहचले अडीचशेपार, दिवसागणिक वाढतोय धोका

सकाळ वृत्तसेवा

अकोला  : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळण्याची गती मंदावलेल्या अकोल्यात रविवारी (ता.१७) या एकाच दिवशी तब्बल ३७ कोरोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये एका माजी नगरसेवकासह एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रविवारी संसर्ग तपासणीचे १७६ अहवाल प्राप्त झाले.

त्यातील १३९ अहवाल निगेटिव्ह तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २५७ झाली आहे. मूर्तिजापूर येथील एक व्यक्ती मयत झाला असून, आज सकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर प्रत्यक्षात १२२ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २५५१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २४१४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २१५७ अहवाल निगेटिव्ह तर २५७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. १३७ अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यंत एकूण २५५१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २३३०, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ नमुने होते. आजपर्यंत एकूण २४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २१९३ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २१५७ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल २५७ आहेत.तर आजअखेर १३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

रविवारी ३७ पॉझिटिव्ह
रविवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या १७६ अहवालात १३९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या ३२ रुग्णात १० महिला व २२ पुरुष होते. त्यात एक महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी तारफ़ैल-चार,माळीपूरा-चार, खैर मोहम्मद प्लॉट-चार, आंबेडकर नगर-तीन, ताजनापेठ-तीन,अकोट फ़ैल-तीन तर मुर्तिजापूर,आगरवेस,बिरलागेट जठारपेठ,खरप, काळा मारोती, ओल्ड आळशी प्लॉट, वर्धमान डुप्लेक्स राजपुतपुरा,रामदासपेठ पोलिस क्वांर्टर, नायगाव, खोलेश्वर, शास्त्रीनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांपैकी तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोटफैल व डाबकी रोड येथील रहिवासी आहेत.


एकाचा मृत्यू
दरम्यान रविवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण मयत असून, तो १३ मे रोजी मयत झाला आहे. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण ४८ वर्षीय पुरुष असून, मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे.

कोरोना अपडेट
पाॅझिटिव्ह अहवाल 257
मृत्यू 17
आत्महत्या 1
उपचार घेत असलेले रुग्ण 122
पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 117 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Results: अजितदादांनी तिकीट नाकारलं! पठ्ठ्या ऐनवेळी भाजपमध्ये गेला अन् निवडून आला... शितोळे विरुद्ध शितोळे लढत शेवटपर्यंत अटीतटीची

Panchang 17 January 2026: आजच्या दिवशी ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Chhatrapati Sambhajinagar Election Result : छत्रपती संभाजीनगरात भाजपचा झंझावात! ५७ जागा जिंकत मिळविली एकहाती सत्ता

IND U19 vs BAN U19 : वैभव सूर्यवंशी धावांचा पाऊस पाडणार; भारताचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना केव्हा, कुठे होणार? जाणून घ्या डिटेल्स

Latest Marathi News Live Update : महापौर पदाचं आरक्षण कुणाला? गॅझेट प्रक्रिया सोमवारपासून

SCROLL FOR NEXT