injection google
विदर्भ

आता म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन फक्त १२०० रुपयांत

भाग्यश्री राऊत

कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांवर स्टिरॉइड तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. यामुळेच इतर आजारांनी डोकं वर काढलं आहे.

नागपूर : राज्यात सध्या म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत भारतातील एकच कंपनी म्युकरमायकोसिससाठी लागणारे अ‌ॅम्फोटेरेसीन बी (amphotericin b injection) हे इंजेक्शन तयार करत होती. मात्र, आता वर्ध्यातील जेनेटेक लाइफ सायन्सेस या कंपनीमध्ये हे इंजेक्शन तयार करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून या इंजेक्शनचे वितरण सुरू केले जाणार असून अवघ्या १२०० रुपयांत हे इंजेक्शन मिळणार आहे. याबाबत स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. (amphotericin b injection will distribute from monday by wardha company says nitin gadkari)

कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रुग्णांवर स्टिरॉइड तसेच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यात आला. यामुळेच इतर आजारांनी डोकं वर काढलं आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरला जाणारा ऑक्सिजन देण्यात आला. यामुळे बुरशीचा संसर्ग वाढल्याचे म्हटले जात आहे. तसेच व्हेंटिलेटरमध्ये डिस्टिल वॉटरचा वापर करण्यात आला नाही, यामुळे अनेकदा व्हेंटिलेटरमधील काही कणांमुळे हा आजार बळावला असल्याचे तज्ज्ञ सांगतात, तर काहींना स्टिरॉईडच्या अमर्याद वापरानेही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

विशेष दातांशी संबधित, जबड्याशी संबधित, नेत्र तसेच कान नाक घसा या विकाराशी संबधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. बुरशीचा संसर्ग झाल्यावर चेहरा सुजणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलटी येणे, ताप येणे, छातीत दुखणे, साइनस कंजेशन, नाकाच्या आत आणि तोडांमध्ये काळे डाग येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. आधीपासून कॅन्सर, मधूमेहसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बुरशीचे आजार होण्याची अधिक शक्यता असते.

या आजारासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनचा तुटवडा होता. तसेच हे इंजेक्शन जवळपास ७ हजार रुपयांमध्ये विकले जात होते. त्यानंतर रेमडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपनीला हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी गडकरी यांनी मिळवून दिली. आता हे इंजेक्शन तयार झाले असून समोवारपासून वितरीत केले जाणार आहे.

राज्यात म्युकरमायकोसिसचे ४ हजार ५० रुग्ण -

नव्यानेच म्युकरमायकोसीस नावाचा बुरशीजन्य आजाराचे थैमान महाराष्ट्रात सुरू झाले आहे. अवघ्या महिनाभरात राज्यात ४ हजार ५० बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून २८८ जणांना काळ्या बुरशीमुळे जीव गमावला लागल्याची माहिती पुढे आली आहे. (amphotericin b injection will distribute from monday by wardha company says nitin gadkari)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पाणी प्रश्न पेटणार

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT