ankur project : The initiative of the Juvenile Justice Board
ankur project : The initiative of the Juvenile Justice Board 
नागपूर

‘अंकुर प्रोजेक्ट’! जाणून घ्या विधिसंघर्षग्रस्त बालकांना स्वयंशिस्त लावणारा उपक्रम...

योगेश बरवड

नागपूर : विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसनाच्यादृष्टीने बाल न्याय मंडळातर्फे शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात ‘अंकुर प्रोजेक्ट' राबविला जात आहे. ‘पेराल ते उगवेल’ म्हणीचा खरा अर्थ मुलांना उमजावा, मुलांमध्ये स्वयंशिस्त लागावी, समाजहिताचे विचार रुजावेत हे या प्रकल्पाचे ध्येय आहे. 

बालकांसाठी २१ जुलैपासून अंकुर प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात बालकांना विविध भाज्यांची व झाडांची लागवड व उगवण करण्यात प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच मशरूम लागवड व मशागत देखील निरीक्षणगृहातील एका खोलीमध्ये येथील मुले उत्तमरीत्या करीत आहेत. या उपक्रमात मुलांनी वाफे तयार करून त्यामध्ये पालक, मेथी, टोमॅटो, मिरची, आले या सारख्या भाज्यांची लागवड केली आहे.

विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या मनात तेच विचार मनात घोळू नये म्हणून त्यांना कामात गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्यात स्वयंशिस्त व काळजी या दोन गोष्टींची बिजे रुजावीत यासाठी त्यांना दैनंदिन जीवनात लागणारा भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून त्यात मुलांनी आवड दाखवली आहे.

हा प्रकल्प बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी शर्वरी जोशी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या उपक्रमात बालकांचा सहभाग चांगला आहे. अंकुर प्रकल्पासाठी निरीक्षण गृहाच्या अधीक्षक नम्रता चौधरी मुलांना प्रोत्साहन देत आहेत. यापूर्वी एका प्रकरणात बाल न्याय मंडळाने सेवाकार्य तसेच बागकाम करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय यापूर्वीही बाल न्याय मंडळाने विधिसंघर्षग्रस्त बालकांसाठी घेतलेले निर्णय मार्गदर्शक ठरले होते हे विशेष. 

मुलांचे समुपदेशन 
कोरोनाच्या काळातही बाल न्याय मंडळाचे काम अविरत सुरू असून दररोज प्रकरणांचा निपटारा केला जात आहे. विविध प्रकरणांत न्यायदंडाधिकारी शर्वरी जोशी व दामोदर जोगी समुपदेशनाद्वारे मुलांना शिक्षण, पुनर्वसन व त्यांच्या भावी आयुष्याबाबत समजावून सांगत आहेत.

(संपादन : प्रशांत राॅय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT