bad photos sent to sweetheart's future husband
bad photos sent to sweetheart's future husband 
नागपूर

प्रेयसीच्या भावी पतीला पाठवले अश्‍लील फोटो अन् साखरपुड्यानंतर मोडले लग्न

अनिल कांबळे

नागपूर : कॉलेजमध्ये शिकताना वर्गमित्रासोबत सूत जुळले. चार वर्षे प्रेमप्रकरणानंतर प्रेयसीने अचानक अन्य युवकासोबत साखरपुडा आटोपला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने अश्‍लील फोटो प्रेयसीच्या भावी पतीला पाठवले. दोन कुटुंबामध्ये वाद झाल्याने अखेर लग्न मोडले. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा परिसरात २७ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी रिया (बदललेले नाव) आई-वडिलांसह राहते. ती एका नामांकित शाळेत शिक्षिका आहे. तिचे वडील व्यापारी आहेत. ते पूर्वी दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत कॉलेजमध्ये शिकताना रियाची झारखंडमधील रामगढ शहरात राहणारा आरोपी विनय कुमार तनुलाल दास (२७) याच्याशी मार्च २०१७ मध्ये मैत्री झाली. तो सुद्धा शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला आला होता. तो कॅम्पुटर एक्सपर्ट आहे.

जानेवारी २०२० पर्यंत दोघांचे संबंध व्यवस्थित होते. दोघांचे फेसबूक आणि वॉट्सॲपवरून चॅटिंग सुरू झाली. दोघांची मैत्री घट्ट झाल्यामुळे एकमेकांवर विश्‍वास बसला. तेव्हापासून दोघेही फोनवरून संपर्कात होते. दोघांनी आपापल्या कुटुंबीयांची माहिती दिली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

एकमेकांना स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पाठवणे सुरू झाले. विनयने रियाचे अनेक फोटो मागवले आणि ते फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले. गेल्या काही महिण्यांपूर्वी रियाचे अभियंता असलेल्या युवकाशी लग्न ठरले. तिने भावी पतीबाबत माहिती विनयला दिली. एवढेच नव्हे तर त्याचा मोबाईल नंबरही दिला होता.

लग्न मोडण्यासाठी दबाव

प्रेमात वेडा झालेल्या विनयने रियाला लग्न मोडण्यासाठी दबाव टाकला. त्याने वारंवार धमक्या दिल्या. तिला लगेच लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने आत्महत्य करण्याची धमकी दिली. लग्न न मोडण्यावर रिया ठाम राहिली.

तयार केले अश्‍लील फोटो

विनयकडे असलेले रियाचे फोटो ॲप्सच्या माध्यामातून मॉर्फ करीत अश्‍लील फोटो तयार केले. ते अश्‍लील फोटो रियाचा होणारा पती आणि तिचा भाऊ या दोघांच्या मोबाईलवर पाठवले. याबाबत रियाला विचारणा करण्यात आली. तिने विनयच्या कृत्याबाबत सर्व काही कुटुंबीयांना सांगितले. तसेच त्याच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णयही कळवला.

सोशल मीडियावर केली बदनामी

विनयने रियाचे फेक अकाऊंट तयार केले. तसेच इंस्टाग्रामवरही अश्‍लील मॅसेज आणि फोटो पाठवले. रियासोबत मंदिरात लग्न झाल्याची पावती तयार केली. ‘रिया माझी पत्नी असल्यामुळे तिचे लग्न लावून देऊ शकत नाही,’ अशी धमकीही दिली. याप्रकरणी रियाने दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी विनयविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

शाळेत केला होता तमाशा

२०१८ ला आरोपी विनय हा झारखंडवरून नागपुरला आला होता. तो थेट रियाच्या शाळेत पोहोचला. त्याने रियाशी शाळेच्या आवारातच अश्‍लील चाळे केले होते. तिला लग्नाची गळ घातली होती. याप्रकरणी रियाने हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. विनयवर गुन्हा दाखल झाला होता.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT