Bhaskar Halami sakal
नागपूर

Gadchiroli Motivational Story: दोन वेळ खायची भ्रांत असणारा मुलगा आता अमेरिकत मोठा वैज्ञानिक

एक प्रेरणादायी कहाणी विदर्भाच्या गडचिरोलीत समोर आली आहे.

निकिता जंगले

माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. जो संघर्षावर मात करुन समोर जातो, त्याला आयुष्यात यश मिळतंच. याचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी कहाणी विदर्भाच्या गडचिरोलीतून समोर आली आहे.

नव्वदच्या दशकात गडचिरोली सारख्या एका दुर्गम भागात उपाशी पोटी झोपणाऱ्या मुलाचा काय संघर्षमय प्रवास म्हणावा जो आज युएस मध्ये वैज्ञानिक म्हणून काम करतोय. भास्कर हलामी असं या मुलाचं नाव आहे. (Gadchiroli boy Bhaskar Halami a scientist in the america life journey inspirational story)

कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी गावात आदिवासी समाजात जन्मलेल्या भास्कर हलामी याचं लहानपण अगदी हलाखीतून गेलंय. हलामीचे वडिल कसे तरी दोन वेळच्या जेवणाची सोय करायचे.

हलामीच्या जन्मानंतरच्या पाच वर्षानंतर त्यांच्या वडिलांना कामगार म्हणून हंगामी सरकारी प्रकल्पांमध्ये काम करायचे आणि कुरखेडा तहसीलमध्ये असणाऱ्या त्यांच्या वडिलोपार्जित शेतीची मशागत करायचे.

आज हलामी वॉशिंग्टन डीसी मध्ये एक वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून एका क्लिनिकल-स्टेज RNA therapeutics biopharmaceutical कंपनीमध्ये काम करतोय. औषधांमध्ये शरीरासाठी घातक असणाऱ्या गोष्टी तपासण्याचं काम तो संशोधनातून करत असतो.

हलामी जवळजवळ दहा वर्षापासून अमेरिकेत राहतो. त्याने तिथे Organic or Medicinal chemistry मध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. हलामी याचा सध्या यूएसमध्ये सहा आकडी पगार आहे तरीसुद्धा त्याने केलेला संघर्ष तो कधीच विसरलेला नाही.

या विषयी बोलताना तो म्हणतो, “मी सहन केलेल्या भुकेच्या वेदना मी कधीही विसरू शकत नाही. माझ्या आईवडीलांनी खुप कष्ट केले. माझे आईवडील आताही सांगतात की दरवर्षी दोन किंवा तीन महिने असे यायचे जेव्हा आपल्याकडे खाण्यासाठी काहीच नसायचे. मजूर म्हणून कोणतेही काम मिळायचे नाही, शेतीतून उत्पन्न होत नव्हते. तेव्हा ते महुआच्या फुलांसाठी जंगलात फेरफटका मारायचे आणि त्यापासून बनविलेल्या गोष्टी विकून कसं तरी पोट भागवायचे."

भास्करचं आयुष्य तेव्हा बदललं जेव्हा त्याच्या वडिलाला एका आश्रम शाळेत आचारी म्हणून काम मिळालं. 982-83 च्या त्या काळात त्याच्या वडिलांना एका ओळखीच्या व्यक्तीने एटापल्ली तालुक्यात नोकरी आहे असं सांगितले तेव्हा त्यांनी चक्क 100 किमी सायकल चालवल्याचे भास्कर सांगतो.

भास्करचे कुटूंब शाळेच्या कॅम्पसमध्ये राहायचे त्यामुळे नकळत भास्करला शिक्षण मिळाले. भास्कर सकाळी बालवाडीमध्ये जायचा तर दुपारनंतर तो पहिल्या वर्गात जायचा. शाळेचा स्टाफ आमि विद्यार्थी कॅप्मसमध्ये रहायचे त्यामुळे त्यांच्यासोबत कुटूंबासारखे घनिष्ट नाते होते म्हणून मोठ्या वर्गात बसण्यावरुन त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. सुदैवाने भास्कर अभ्यासात हूशार होता जे त्याला पुढे खूप कामात आलं.

भास्करचे वडिल नेहमी म्हणायचे शिक्षण हे आपल्या गरीबीतून निघण्याचा मार्ग आहे. त्यांनी मला नेहमी शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिलं.
बारावी आणि बीएससी पूर्ण करण्यासाठी पुढे भास्कर गडचिरोली शहरात गेला. त्यानंतर त्याने नागपूरच्या प्रतिष्ठित आणि फेमस कॉलेज Institute of Science मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. 2003 मध्ये नागपूरच्या लक्ष्मीनारायण Institute of Technology मध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून नोकरीला सुरवात केली. त्यानंतर दहा वर्षानंतर भास्कर PhD साठी युएस आला आणि आता तो युएस मध्ये उत्तम नोकरी करतो.

भास्कर म्हणतो की संघर्ष हा जीवनाचा भाग आहे. त्याला खेळवत बसू नका. संघर्षावर मात करा, तुम्ही पुढे जाणार. आयुष्याचा प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्यासाठी असतो. त्याचा योग्य उपयोग करुन स्वत:ला पुढे आणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT