नागपूर : ‘मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती आहे. उपचारासाठी मला पैशाची गरज आहे. माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका.’ असा मॅसेज फेसबूक प्रोफाईल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाईकांना येतो. काळजीपोटी मित्र आणि नातेवाईक लगेच दिलेल्या खात्यात पैसे टाकतो, हा सर्व प्रकार सायबर हॅकर्स करीत आहेत. आतापर्यंत अनेकांचे फेसबूक प्रोफाईल हॅक करून लाखोंची खंडणी उकळली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णत: माहित नाही.
त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनांही वाढत आहेत. अनेक तरुण-तरुणी कमी वय असूनही खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर प्रोफाइल उघडत आहेत. त्यामुळे ते अगदी सहज ‘सायबर गुन्हेगारांच्या’ जाळ्यात सापडत आहेत.
सायबर गुन्हेगार हे फेसबूक हॅक करतात. त्यानंतर नातेवाईकांना थेट मॅसेज करून खात्यात पैसे पाठविण्याची विनंती केली जाते. नातेवाईकांनी टाकलेली रक्कम थेट हॅकर्सच्या खात्यात वळती होते. अशाप्रकारे हॅकर्स फसवणूक करतात. त्यामुळे फेसबुकचा वापर करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कुण्या मित्राचा पैशासाठी फेसबूक मॅसेज करीत असेल तर लगेच सावध व्हा, तो सापळा असू शकतो.
सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, फेसबुक, व्हॉट्स ॲपवरून अश्लील संदेश किंवा फोटो पाठविणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणे, बदनामीकारक मजकूर किंवा फोटो पोस्ट करणे, फेसबूकचे अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे यांची संख्या जास्त आहे.
फेसबूकवर खाते उघडताना युजर्स हे पासवर्ड म्हणून स्वतःचा मोबाईल क्रमांक किंवा वाहनाचा नंबर टाकतात. त्यामुळे हॅकर्स आपलाच प्रोफाईल तपासून पासवर्ड हॅक करतात. त्यामुळे किचकट किंवा स्ट्राँग पासवर्ड ठेवल्यात फेसबूक हॅक होण्याची शक्यता कमी असते.
फेसबुक आयडी लॉक करून ठेवा
फेसबूक अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून प्रायवेसी सेटिंग मोड करून ठेवावे. वैयक्तिक माहिती शेअर करू नका. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. फेसबूकवरून कुणी पैसे मागितल्यास पहिल्यांदा फोन करून खात्री करा. आपली फेसबुक आयडी लॉक करून ठेवावी. फ्रेंड्सची खात्री करून घ्यावी. जेणेकरून फसवणूक होणार नाही.
- केशव वाघ,
सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.