नागपूर : शहरात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे निराशाजनक स्थिती असताना आज अडीच हजारांवर बाधितांनी योग्य उपचार व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली. कोरोनाच्या बळीसंख्येचा आलेख मात्र चढता आहे. शुक्रवारी ५३ जणांचा मृत्यू झाला. शहरातील विविध लॅबमधील चाचणी अहवालातून २,०६० नवे बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. चिंताजनक स्थितीत आतापर्यंत ३५ हजारांवर बाधित कोरोनामुक्त झाल्याने विश्वासाचे वातावरण दिसून येत आहे.
शहरातील यंत्रणेने कोरोनापुढे हात टेकल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बिनधास्त फिरणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णांचे तसेच बळींचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
यात शहरातील ३९ तर ग्रामीणमधील १० जणांचा समावेश आहे. ४ बाधित जिल्ह्याबाहेरील आहे. या मृत्यूसह कोरोनाबळींची संख्या १५६९ पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील १,२०२ तर ग्रामीणमधील २२६ जणांचा समावेश असल्याने गावांमध्येही कोरोना घट्ट पाय रोवत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मेयो, मेडिकल, एम्स, माफसू, नीरी, खाजगी लॅबमधून आलेल्या कोरोना अहवालातून २,०६० जण नवे बाधित आढळून आले असून शहरातील १,६०९ जणांचा समावेश आहे. गावांमधील ४४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८ हजार ५५० पर्यंत पोहोचली आहे.
घराआड कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका, आरोग्य यंत्रणेत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक मृत्युमुखी पडत आहे, प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवून प्रयत्न सुरू असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे आता प्रशासनाबाबत चीड निर्माण होत आहे.
काल २,६५९ रुग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत एका दिवसांत बरे होणाऱ्यांची ही उच्चांकी संख्या आहे. त्यामुळे कोरोनाबाबत तत्काळ उपचार सुरू केल्यास त्यातून बरे होऊ शकतो, असा विश्वास निर्माण झाला आहे. आतापर्यंत ३५ हजार ७३८ जण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे यात घरीच उपचार घेणाऱ्या १९ हजार ७२४ रुग्णांचा समावेश आहे. एकूणच बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७३.६१ पर्यंत पोहोचला आहे.
शहरात सध्या ११ हजार २४३ जणांवर उपचार सुरू आहे. यात ५ हजार ८६९ जण घरीच उपचार घेत आहेत. शहरात आज ८,८७४ जणांची चाचणी करण्यात आली. आतापर्यत ३ लाख ३६ हजार ३६४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.