ozone esakal
नागपूर

नागपुरातील जमिनीवरील ओझोनमध्ये वाढ! श्वसन नलिकेचे त्रास

राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

वाहनाचा वाढलेला वापर आणि कोळशाच्या ज्वलनामुळे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढते आहे.

नागपूर: आकाशातील ओझोनचा थर जरी कमी होत असला तरी जमिनीवरील ओझोनच्या प्रदूषणामुळे वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यासह रबर आणि प्लास्टिक वस्तू खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने मानवाला श्वसन नलिकेचा त्रास होऊ लागला आहे. वाहनाचा वाढलेला वापर आणि कोळशाच्या ज्वलनामुळे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनीवरील ओझोनचे प्रमाण वाढते आहे.

जागतिक पातळीवर अवकाशातील ओझोन भरून निघत असल्याने गेल्या दहा वर्षात केलेल्या अभ्यासातून उघड झाले आहे. आकाशातील छिद्र भरून निघत असताना दुसरीकडे जमिनीवर ‘बॅड' ओझोनचे प्रमाण वाढू लागले आहे. उंचीवर असलेल्या वातावरणातील ओझोनचा पट्टा साधारणतः जमिनीपासून २५ ते ५० किलोमीटर अंतरावर असतो. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना ओझोन वायू अटकाव करतात. जमीन पातळीवरही ओझोन असतो. त्याला ‘बॅड ओझोन’ असे संबोधले जाते. त्यात सातत्याने वाढ होत आहे जे पर्यावरणासाठी घातक आहे. जमिनीच्या पातळीवर १ क्युबिक मीटर हवेत १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी ओझोन असेल तर तो धोकादायक ठरत नाही. उन्हाळ्यात अधिक वाढ असून ती धोकादायक असते.

ओझोनच्या संरक्षक कवचाला अनेक ठिकाणी छिद्रे पडलेली असून तो विरळ झाला आहे. यातून जगापुढे गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. अतिनील-बी किरणे पृथ्वीवर पोहोचली तर पूर्ण जीवसृष्टीचा विनाश होईल. वातावरण व हवामानातील बदलामुळे मागील वर्षी ओझोन छिद्राच्या आकारात वाढ झाली आहे. ती कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या ४० वर्षापासून वाढत चाललेल्या ओझोन छिद्राची वाढ कमी होत असल्याचा निष्कर्ष नासा आणि जागतिक हवामान विभागाच्या अभ्यासातून काढला आहे. वातावरणातील ओझोन हा सजीवांचे रक्षण करतो. परंतु, हाच वायू जमिनीवर निर्माण झाला तर सजिवांसाठी धोकादायक आहे. म्हणून ओझोनला ‘गुड ओझोन’ आणि 'बॅड ओझोन' असे संबोधले जाते. दुर्दैवाने आपल्या वाहनांचा धूर, कोळशाचे ज्वलन यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हा वायू जमिनीवर निर्माण होत आहे. ते धोकादायक ठरत आहे.

ओझोन छिद्रामुळे होणारे घातक परिणाम सुदैवाने आंतरराष्ट्रीय संघटनांच्या लक्षात येऊन त्यांनी ओझोन थराच्या संरक्षणार्थ योग्य ती पावले उचलली. त्याचाच परिणाम म्हणून १९८७ साली मॉण्ट्रियल करार झाला. आकाशातील ओझोनचा थर जरी कमी होत असला तरी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनीवरील ओझोनचा स्तर वाढतो आहे. हे चिंताजनक आहे.

- प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट.

जागतिक पातळीवरील स्थिती

वर्ष - दशलक्ष चौरस किलोमीटर

२०१० -२२.६

२०१६ - २३

२०१७ - १९.६

२o१९ -१६.४

२०२० -२४.८

नागपूरची ओझोन स्थिती

फेब्रुवारी - २०१९ - १३८.५ मायक्रोग्रॅम

मार्च २०१९- ११९.३ मायक्रोग्रॅम

मे -२०२१ - १४२.३ मायक्रोग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT