weather update school in morning Implementation from March 15 Heat Action Plan nagpur esakal
नागपूर

Nagpur News : तापमानाचा धसका; १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात

१५ मार्चपासून अंमलबजावणी; ‘हीट ॲक्शन प्लान’ही तयार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फेब्रुवारीमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने महापालिका, जिल्हा परिषद प्रशासनही सतर्क झाले आहे. येत्या १५ मार्चपासून ग्रामीण व शहरातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे शहरातील लाखावर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या उन्हामुळे यंदा ‘हीट ॲक्शन प्लान’चीही अमलबजावणीही लवकर केली जात आहे. महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली.

यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरणार असल्याचे संकेत फेब्रुवारीमध्येच मिळाले. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही दोन दिवसांपूर्वीच ‘हीट ॲक्शन प्लान’संदर्भात पोलिस, हवामान विभाग, व्हीएनआयटीचे प्राध्यापक, मनपाचा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यंदा प्रथमच हिट ॲक्शन प्लानच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये बैठक घेण्यात आली. वाढत्या उन्हात शहरात करावयाच्या उपाययोजनांबाबत आयुक्तांनी सूचना केल्या होत्या. शाळांबाबतही त्यांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या होत्या.

वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याबाबत निर्णय घेतला. महापालिकेनेही शहरातील शाळांबाबत हाच निर्णय कायम ठेवला, असल्याचे मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी नमूद केले. त्यामुळे येत्या १५ मार्चपासून शहरातील शाळांमधील सर्वच वर्ग सकाळच्या सत्रात घेतले जाणार आहे.

प्याऊ करा सुरू

याशिवाय विविध धर्मादाय संस्थांनी शहरात ठिकठिकाणी प्याऊ सुरू करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे. विविध बांधकाम कंत्राटदारांनी त्यांच्या कामावरील मजुरांना दुपारी एक ते साडेतीन वाजेपर्यंत विश्रांती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

मेडिकल, मेयो हॉस्पिटलसह महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिक येतात. येथील प्रशासनाने नागरिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी ग्रीन नेट लावावी. याशिवाय प्याऊ सुरू करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा. बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्याकडील मजुरांना दुपारी एक ते साडेतीन वाजेपर्यंत विश्रांती द्यावी.

- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT