Sharad Pawar to visit farmers on Vidarbha tour
Sharad Pawar to visit farmers on Vidarbha tour 
विदर्भ

शरद पवार विदर्भ दौऱ्यावर; बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार आज (गुरुवारी) सकाळी दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेटी घेणार आहेत.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तेचा सारिपाट शरद पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही तसेच सत्तेत सहभाही होण्याची भूमिका घेतल्यास मंत्रिपदाचे वाटप व समान कार्यक्रमाची आखणी करण्याची जबाबदारी पवार यांच्यावरच सोपविण्यात आली आहे. सध्या रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षातील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. 

या धावपळीतही पवार पीकपाण्याचा आढावाच नव्हे तर बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. 14 नोव्हेंबरला ते पूर्व विदर्भातील पीकपाण्याची पाहणी करणार आहेत. गुरुवारी मुक्काम केल्यानंतर 15 नोव्हेंबरला 

कडबी चौक स्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता ते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पवार यांचा दौरा केवळ सत्तेचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT