Three small sisters died in Yavatmal 
विदर्भ

शेजारच्यांनी शेतात असलेल्या आई-वडिलांना केला फोन अन्‌ फोडलेला हंबरडा होता हृदय पिळवटून टाकणारा

राजेश काळे

राळेगाव (जि. यवतमाळ) : कोदुर्ली श्रीरामपूर हे लहानसे गाव... गावातील भुसेवार कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची... आई-वडील मजुरीसाठी शेतात गेल्यावर तीन चिमुकल्या बहिणी घरीच राहायच्या... वयाने लहान असल्या तरी एकमेकींना जिवापाड सांभाळून घेत होत्या... क्षणात काळाने घाला घातला... त्यामुळे गावाच नव्हे, तर तालुक्‍यातून हळहळ व्यक्त होत आहे... काय सांगावे, काय बोलावे, भुसेवार दाम्पत्याची समजूत कशी काढावी... कुणाकडेही शब्द नव्हते... त्या घटनेमुळे अख्खे गावच निःशब्द झाले... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राळेगावपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर कोदुर्ली श्रीरामपूर हे गाव आहे. येथील गजानन भुसेवार यांच्याकडे शेती असली तरी कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी दाम्पत्याला मजुरीदेखील करावी लागते. गुरुवारी भुसेवार दाम्पत्य मजुरीसाठी सकाळी शेतात गेले होते. यावेळी तीन बहिणी रिया भुसेवार (वय आठ), संचिता भुसेवार (वय सहा) व मोना भुसेवार (वय चार) या घरीच होत्या.

बहिणी जेवण करण्यासाठी एकत्र बसल्या असताना मोठी रिया ही कुलर सुरू करण्यासाठी गेली. तिला विजेचा जोरदार धक्का लागला. मोठ्या बहिणीला काहीतरी झाल्याचे लक्षात येताच संचिता व मोना या धाव घेतली. या घटनेत तिघींचाही जागीच मृत्यू झाला. आई-वडील मजुरीसाठी शेतात गेल्याने तिघीही बहिणी काही वेळ तशाच निपचित पडून राहिल्या.

काही वेळाने ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आली. घटनेची माहिती वडील गजानन व आई रेश्‍मा भुसेवार यांना मिळताच त्यांनी तत्काळ घर गाठले. तिन्ही काळजाचे तुकडे आपल्यात नाहीत, हे मान्य करायला दोघेही तयार नव्हते. लेकींना कवटाळत फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदनानंतर सायंकाळी तिघीही चिमुकल्या बहिणींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. 

नियती कसा घात करेल, याचा नेम नाही

नियती कुठे दबा धरून बसली आहे आणि कसा घात करेल, याचा नेम नाही. आई-वडील मजुरी करण्यासाठी शेतात गेले असताना घरी असलेल्या चिमुकल्या तिघी बहिणींवर काळाने घाला घातला. कुलरचा शॉक लागल्याने तिघींचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील कोदुर्ली श्रीरामपूर येथे गुरुवारी (ता. 30) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली.

मदत मिळण्यास अडचणी 
मुली लहान आहेत. घटना नैसर्गिक नसल्याने कुटुंबाला मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. तरीदेखील महावितरण कंपनीला पंचनामा करण्यास सांगितले आहे. 
- डॉ. रवींद्र कानडजे, तहसीलदार

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Herald case : 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरणी राहुल अन् सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ होणार?; 'ED'ने टाकलं मोठं पाऊल!

Kolhapur Gazette: मराठा आरक्षणासाठी सर्वात मोठा पुरावा! कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी अन् मराठ्यांची 'अशी' नोंद

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Latest Marathi News Updates: संभाजी नगरमध्ये उपमुख्यमंत्र्यांचं जोरदार स्वागत

SCROLL FOR NEXT