Pressure Cooker Repair Tips
Pressure Cooker Repair Tips Esakal
वुमेन्स-कॉर्नर

Pressure Cooker Repair: प्रेशर कुकरमधून डाळ बाहेर येतेय, मग या किचन टिप्स येतील कामी

Kirti Wadkar

Pressure Cooker Repair Tips: महिला वर्गाचं स्वयंपाक घरातील kitchen भांड्यांवर विशेष प्रेम असतं. भांडी व्यवस्थित आणि चांगली रहावीत असं प्रत्येकीला वाटतं. मात्र अनेकींना रोजच्या कामात या भांड्यांकडे लक्ष देणं काही वेळा जमत नाही.

स्वयंपाक Cooking घरात महत्वाचं अससेलं भांड म्हणजे प्रेशर कुकर. जवळपास प्रत्येक किचन मध्ये एक तरी कुकर असतोच. Kitchen Tips in Marathi Maintenance of your pressure cooker

कुकरमुळे वेळीची आणि गॅसची Cooking Gas चांगलीच बचत होते. शिवाय खिचडी, छोले, राजमा असे काही पदार्थ शिजवण्यासाठी कुकर Cooker अधिक सोयीस्कर ठरतो. मात्र बऱ्याचदा कुकर जुना झाला की त्यात योग्यप्रकारे प्रेशर तयार होत नाही.

परिणामी पदार्थ शिजण्यासाठी अडचणी निर्माण होतात. कधी कुकरची शिटीच होत नाही. तर कधी शिट्टीमधून संपूर्ण डाळ बाहेर येते. अशा वेळी नेमकं काय करावं सुचतं नाही. 

खरं तर इतर मिस्कर, फिल्टर अशा वस्तूंप्रणाणेच प्रेशर कुकरलाही मेंटेनंसची गरज असते. कुकरला तुम्हाला पुन्हा नव्या प्रमाणे दुरूस्त करणं शक्य आहे. अनेकदा आपल्याचं काही चुकीच्या सवयींमुळे अशी भांडी खराब होत असतात. म्हणूनच कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते पाहुयात. 

स्टीम लीक होत असल्यास : अनेकदा कुकरमध्ये एखादा पदार्थ शिजण्यासाठी आपण ठेवतो. मात्र कुकरचं झाकण बंद केल्यानंतर झाकणाच्या कडेने वाफ बाहेर येत असल्याचं आपल्या लक्षात येत.

बऱ्याचदा कुकरचं झाकण वाकडं झाल्याने ही वाफ बाहेर येत असते. या साठी तुम्ही भांड्यांच्या दुकानात किंवा कुकर दुरुस्त करणाऱ्यांकडून हे झाकणं दुरूस्त करून आणू शकता.

कुकरमध्ये प्रेशर तयार होत नसल्यास: प्रेशर कुकरमध्ये योग्य प्रकारे प्रेशर तयार झालं नाही तर अन्न शिजण्यास अडचणी होवू शकते. काही वेळा कुकरची बराच काळ सिट्टी होत नाही.

अशावेळी कुकुरती रबर रिंग काढून चेक करावी. ही रिंग डॅमेज झाल्याने कुकरमध्ये प्रेशन तयार होत नाही. ही रबर रिंग २-४ महिन्यातून बदलणं गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

अन्न करपू लागल्यास- कुकरमध्ये अन्न पदार्थ शिवताना ते तळाशी चिटकू लागले किंवा करपू लागले तर कुकुरमध्ये योग्य प्रकारे प्रेशर तयार होत नाहीय हे समजावे.

कुकरमध्ये जास्त प्रेशर तयार होणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे कुकरचा स्फोट होवू शकतो. यामुळे अन्न चिटकू लागण्यास लगेचच कुकुर दुरुस्त करून आणणं गरजेचं आहे. 

कुकरमधून पाणी किंवा डाळ बाहेर येणं- अनेकदा कुकरमध्ये पदार्थ शिजवत असताना सीटीसोबत पाणी बाहेर येत. जेवण शिजवताना पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास असं होतं. यासाठीच पदार्थामध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकणं गरजेचं आहे. 

त्याचप्रमाणे अनेकदा पातळ पदार्थ जसं की डाळ किंवा सूप शिजवताना त्यातील पाणी बाहेर येत. अशा वेळी कुकरच्या रबरला थोडं तेल लावून ती रिंग झाकणात बसवून झाकणं बंद करावं. यामुळे वाफ बाहेर जाणार नाही.

तसचं कुकरची शिटी काढून ती स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. अनेकदा शिटीमध्ये एखादा अन्न पदार्थ अडकल्याने वाफ बाहेऱ पडण्यास अडचण निर्माण होते. यामुळे शिटीन होणं किंवा शिटीतून पाणी येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

कुकरची शिटी न होणं- अनेकदा कुकरची रबर रिंग लूज झाल्याने योग्य प्रेशर तयार होत नाही. परिणामी शिटी होत नाही तर कधी जेवणं करपतं.यासाठी काही ट्रीक्स तुम्ही वापरू शकता.

कुकर उघडून त्याचं रबर काढावं आणि थंड पाण्याने धुवावं. काही वेळ थंड पाण्याखाली धरल्याने रिंग टाइट होईल आणि प्रेशर तयार होण्यास मदत होईल.

तरीही कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर तुम्ही कुकरची रबर रिंग १ तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवा आणि नंतर तिचा वापर करा.

कुकरचं रबर डॅमेज असेल तर मात्र तुम्हाला नवी रबर रिंग आणवी लागेल.

प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक केल्यानंतर झाकण लगेचच उघडणं शक्य होतं नाही. अशा वेळी अनेकजण सीटीवर उचलून कुकरमधील वाफ बाहेर काढतात.

यावेळी देखील कुकरमधून पाणी बाहेर येण्याची शक्यता असते. त्याएवजी तुम्ही कुकर थेट नळ सुरु करून पाण्याखाली अर्धा मिनिटं धरा. यामुळे कुकर गार होवून झाकणं लगेच उघडेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT