esakal | राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला ते शिवेंद्रसिंह राजेंची उद्विग्न प्रतिक्रिया, वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Afternoon_7.jpg

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला ते शिवेंद्रसिंह राजेंची उद्विग्न प्रतिक्रिया, वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याचवेळी त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन काय चर्चा झाली याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. भाजपचा आज (दि.6) स्थापना दिवस आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.


मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहेत. अनेक गोष्टी बंद केल्या आहेत. हे निर्बंध लागू करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी फोन केला होता व सहकार्याची विनंती केली होती. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - भाजप निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची ह्रदय जिंकण्याचं अभियान आहे, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते दिल्लीमध्ये भाजपच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. वाचा सविस्तर

सातारा : जास्तीत जास्त काय होणार 144 कलम याचा भंग होईल. गुन्हे दाखल होतील. धंदा बंद ठेवून, व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बरं अशी भावना व्यापा-यांची होईल. जिल्हा आणि राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीसाठीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी केले आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजधानी दिल्लीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दिल्ली सरकारने 30 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश दिला आहे. वाचा सविस्तर

चार आठवड्यात महायुद्धाला सुरुवात होऊ शकते, अन् संपूर्ण जग आणि युरोप याचा साक्षीदार राहिल असा इशारावजा दावा रशियाचे लष्कर विशेषज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. वाचा सविस्तर

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यातील अनेक भागात बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहेत. मॉल्स, हॉटेल्स, प्रार्थनास्थळे ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. वाचा सविस्तर

पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री संचारबंदी असतानाही काहीजण शहरामध्ये विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. अशा बेशिस्त नागरिकांविरुद्ध कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ तेवढ्यावरच न थांबता, गरज पडल्यास संबंधित व्यक्तींची वाहनेही जप्त केली जातील. वाचा सविस्तर

लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून रविवारी (ता. चार) तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ८०४ रुग्ण आढळले. आतापर्यंतच्या तुलनेत दिवसभरातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. दरम्यान उपचार सुरु असताना पाच जणांचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थोपविण्‍यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे यापुर्वी काढलेल्या आदेशात बदल करुन आता जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी राज्य शासनाने ता. 30 एप्रिल अखेरपर्यंत लागू केलेले निर्बंध असतील. या आदेशाची सोमवारी (ता. पाच) एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी केली जाईल. वाचा सविस्तर

नायजर : नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात काहींनी पोलीस आणि लष्कराच्या इमारतीवर गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारानंतर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून एकाच वेळी दोन हजार कैद्यांनी पलायन केले असल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर
 

loading image