Anant Ambani : अनंत अंबानी यांची देवदर्शनासाठी पदयात्रा; जामनगर ते द्वारका १७० कि.मी. चालणार
Spiritual Journey : रिलायन्स इंडस्ट्रीजचे वारसदार अनंत अंबानी यांनी जामनगरहून द्वारका मंदिरापर्यंत १७० किलोमीटर पदयात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या श्रद्धायात्रेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
द्वारका : तीर्थस्थळांना चालत जाऊन देवदर्शन करणे भारतीयांना नवे नाही. लाखो सामान्य नागरिक आपापल्या श्रद्धास्थानांवर चालत जातात. मात्र, देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा पुत्र पदयात्रा करत असेल, तर त्याची चर्चा होतेच.