काकडे फौंडेशनतर्फे समूह हिंदी देशभक्ती गीत गायन स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

काकडे फाऊंडेशनतर्फे भाग्यनगर येथील मुक्तांगण विद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी शनिवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी हिन्दी देशभक्ती समूह गीत गायन स्पर्धा...

बेळगाव : विद्यार्थ्यांनी देशभक्तीची गाणी वर्षातून दोन तीन वेळा फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशीच केवळ न म्हणता त्यांनी ती इतरवेळीही म्हणावीत या उद्द्येशाने काकडे फाऊंडेशनतर्फे भाग्यनगर येथील मुक्तांगण विद्यालयातील विद्यार्थ्यांच्यासाठी शनिवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी हिन्दी देशभक्ती समूह गीत गायन स्पर्धा घेण्यात आली.

एकूण 20 समूहातील 100 विद्यार्थी - विद्यार्थिनींनी हिरीरीने यांत भाग घेतला . प्रसाद देऊस्कर, परिणिता यांनी परीक्षक म्हणून सहयोग दिला. विद्यालयाच्या प्राचार्या सविता, स्पर्धा प्रमुख प्रज्ञा हेगडे, काकडे फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे व परीक्षकांच्या  हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली व इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व इतरांनी स्पर्धा यशस्वीरीत्या घेण्यास मदत केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: belgaum news hindi deshbhakti songs kakade foundation