ब्रेकफास्ट अपडेट्सः भंडारा आग दुर्घटना ते ट्रम्प यांचा टिवटिवाट बंद; सगळ्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

वाफळत्या चहासोबत देश-विदेशातील मुख्य घडामोडी फक्त तुमच्यासाठी.. तेही एका क्लिकवर...

1. Live Updates भंडारा जिल्हा नवजात शिशू दुर्घटना : राहुल गांधी यांचे ट्विट, राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. -  सविस्तर वाचा

2. ट्रम्प यांच्या ट्विटटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

शुक्रवारी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हिंसेला चिथावणी देणारी वक्तव्ये होण्याची जोखीम असल्याकारणाने ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. @realDonaldTrump अकाऊंटवरील ट्वीट्सच्या संदर्भांना पाहिलं गेलं आणि त्यानंतरच अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं, असं ट्विटरने स्पष्ट केलंय. - सविस्तर वाचा 

3. हरियाणात दीड लाख कोंबड्या मारणार; बर्ड फ्लूचा फैलाव रोखणार

हरियानात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे निष्पन्न झाले असून पंचकुलातील पोल्ट्री फार्ममधले नमुने पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सुमारे १ लाख ६० कोंबड्यांना मारण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री जे. पी दलाल यांनी सांगितले. - सविस्तर वाचा 

4. गाडीमालकाच्या बायकोसोबत बदमाशांचा पोबारा; किल्ली सोडून गेल्याचा चोरांनी घेतला फायदा

पंजाबच्या डेरा बस्सी येथे विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. दोन बदमाशांनी एका व्यक्तीची गाडी चोरली आहे. पण इथंवरच ही घटना मर्यादीत नाहीये तर या बदमाश चोरांनी टाटा टियागो गाडीच्या आत थांबलेल्या गाडीच्या मालकाच्या पत्नीसमवेत पळ काढला आहे. ही घटना गुरुवारी डेरा बस्सीमधील सुखमनी शाळेजवळ घडली आहे.  - सविस्तर वाचा

5. लष्करप्रमुख पुणे दौऱ्यावर; नवीन कमांड रुग्णालयाचं केलं उद्‌घाटन

लष्कराच्या नवीन कमांड रुग्णालयाचे शुक्रवारी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून लष्करी जवान तसेच, माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांस आरोग्यसुविधा पुरविण्याचे कार्य केले जाणार आहे. - सविस्तर वाचा

6. भंडाऱ्यात ह्रदय हेलावून टाकणारी घटना; PM मोदींसह राहुल गांधींकडून कुटुंबियांचे सांत्वन

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात अर्भकांच्या दुर्देवीरित्या मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याघटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. - सविस्तर वाचा 

7. दहावी-बारावीच्या शाळा ओडिशात सुरू

लॉकडाउनमुळे नऊ महिने बंद असलेल्या ओडिशातील दहावी व बारावीच्या शाळा शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व खबरदारी घेत, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सुरक्षित अंतर राखून विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. - सविस्तर वाचा 

8. ... तर आम्ही वनरक्षकांच्या हाती शस्त्रे देऊ;अधिकाऱ्यांवरील हल्ल्याने सर्वोच्च न्यायालय संतापले

सशस्त्र गुन्हेगार आणि तस्करांकडून वनरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली तसेच त्यांना शस्त्रे, बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट देण्याची तयारी दर्शविली आहे. या वनरक्षकांचे संरक्षण होणे गरजेचे असून प्रसंगी त्यांना शस्त्रे देण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. - सविस्तर वाचा

9. नड्डांची भाजप नेत्यांशी चर्चा;पक्षांतर्गत मतभेद मिटविण्याची सूचना

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी काल विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या महाराष्ट्र व राजस्थानातील भाजप नेत्यांशी स्वतंत्र फेऱ्यांद्वारे चर्चा केली. या चर्चेचे तपशील कळलेले नसले तरी प्रामुख्याने राज्य पातळीवरील पक्षांतर्गत मतभेद कमी कसे करायचे आणि त्याचबरोबर राज्याची एकंदर राजकीय परिस्थिती या मुद्यांवर प्रामुख्याने विचारविनिमय झाल्याचे समजते. - सविस्तर वाचा

10. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लखवीला १५ वर्षांची शिक्षा

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘लष्करे तैयबा’ (एलईटी) या संघटनेचा प्रमुख झकीउर रेहमान लखवी (वय ६१) याला पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. तसेच दंडही ठोठावण्यात आला. - सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast Updates Marathi By Sakal 9 January 2021