एल्गार परिषदेत शर्जीलचं वादग्रस्त वक्तव्य ते दिल्लीतील शेतकरी आंदोलन; वाचा एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Sunday, 31 January 2021

केंद्रीय अर्थसंकल्पातून पेट्रोल दरवाढ कमी होण्यासाठी काही दिलासादायक घोषणा होणार का याकडे लक्ष लागले असून गेल्या चार दिवसात इंधन दर जैसे थे आहेत. वाचा एका क्लिकवर

पुण्यात शनिवारी झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने हिंदू धर्माबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन यापुढेही सुरुच राहणार असून याबाबत केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून पेट्रोल दरवाढ कमी होण्यासाठी काही दिलासादायक घोषणा होणार का याकडे लक्ष लागले असून गेल्या चार दिवसात इंधन दर जैसे थे आहेत.

नवी दिल्ली : मोदींनी मन की बातमध्ये केलेल्या वक्तव्यावर शेतकरी नेता नरेश टिकैत यांनी म्हटलं की, 26 जानेवारी रोजी जे काही झालं तो एका कटाचा भाग होता. याचा व्यापक पातळीवर तपास व्हायला हवा. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा बैठका सुरु होण्याची शक्यता. वाचा सविस्तर

अकोला : वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन, वाचा सविस्तर

पुणे : विकास कामे करताना ती दर्जेदारच व्हायला हवीत, असा आग्रह धरताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाली वाकून गोणपाट बाजूला सारत कामाचा दर्जा तपासला आणि... वाचा सविस्तर

कोलकता  : भाजपच्या ‘जय श्रीराम’ या घोषणेला टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचा 'हे राम'... वाचा सविस्तर

नवी दिल्ली :  सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अशी अपेक्षा केली जात आहे की, पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी केला जाईल. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. जाणून घ्या आजचे दर वाचा सविस्तर 

पुणे : पुण्यात काल एल्गार परिषद झाली. या परिषदेतील एका वादग्रस्त वक्तव्यामुळं नवं वादळ उठलंय. 'हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे' या वक्तव्यामुळं भाजपनं जोरदार टीकेला सुरुवात केलीय. वाचा सविस्तर

पुणे :  पुण्यातलं विमानतळ होणार 'क्वारंटाइन'; पुण्यातील लोहगाव विमानतळ प्रशासनाने एप्रिल आणि मे महिन्यात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

आता जग जगबुडीच्या जवळ आल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. त्याचं कारण प्रलयाच्या घड्याळानं दिलेले संकेत....  वाचा सविस्तर

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा आणि भाजपच्या गुंडांचा सामना करत रस्त्यावर न्यायासाठी ते झगडत असल्याचं त्यांनी म्हटलं. राघव यांनी असा आरोप केला की, भाजप शेतकरी आंदोलन दडपून टाकण्यासाठी गुंडांच्या मदतीने सातत्यानं आंदोलकांवर हल्ले करत आहे. राघव यांनी पत्र लिहून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे केली शेतकऱ्यांच्या सुरक्षेची मागणी.. वाचा सविस्तर

सनी लिओनी नेहमी तिचे काही फोटो आणि व्हिडिओज शेयर करत असते. सध्या तिचं एक फोटोशुट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यात ती एका पूलमध्ये एंजॉय करताना दिसली आहे. पाहा फोटो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: elgar-parishad sharjil usmani pm modi farmers protest delhi bjp tmc west bengal