esakal | बिनधास्त राज ठाकरे ते पूजाच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल; ठळक बातम्या क्लीकवर

बोलून बातमी शोधा

afternoon news}

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात... एक क्लिक... बित्तंबातमीसाठी

बिनधास्त राज ठाकरे ते पूजाच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल; ठळक बातम्या क्लीकवर
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर भारतानं व्यावसायिक विमान उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ केली आहे. पत्रकारांनी मास्क का लावला नाही, या प्रश्नावर राज ठाकरेंनी दिलं बेधडक उत्तर दिलं. ते पूजा चव्हाणच्या मोबाईलवरती, संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल आल्याचा चित्रा वाघ यांचा दावा. यांसह इतर महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लीक करा. 

 1. नवी दिल्ली : कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
   
 2. हैती : येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून येथील कारागृहातून 400 हून अधिक कैदी फरार झाले आहेत. यावेळी झालेल्या गोळीबारात तुरुंग अधीक्षकासमवेत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर
   
 3. नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या संसर्गानं पुन्हा एकदा वेग घेतला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाचा सविस्तर
   
 4. मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं दादर येथील शिवाजी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनामास्क उपस्थिती लावली. यावर पत्रकारांनी विचारलं असता राज ठाकरेंनीही बेधडक उत्तर दिलं. वाचा सविस्तर
   
 5. मुंबई : कोरोनाचं संकट पुन्हा येतं आहे असं वाटत असेल तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. वाचा सविस्तर
   
 6. नाशिक : चित्रा वाघ सातत्याने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. वाचा सविस्तर
   
 7. नागपूर : आरोपी न्यायालयाच्या संरक्षणास व अटकपूर्व जामिनास पात्र नाही, अशा आशयाचा व्हॉट्सअप मेसेज खुद्द उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मिळाला. या प्रकारावर न्यायलयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
   
 8. नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाचा आलेख वाढत आहे. गेल्या दोन दिवसात देशभरात १६,००० हून अधिक कोरोनाची प्रकरणं समोर आली आहेत. यामागे पाच महत्वाची कारणं आहेत. वाचा सविस्तर
   
 9. नवी दिल्ली : टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी मोठा झटका बसला आहे. टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटीतून माघार घेतली आहे. वाचा सविस्तर
   
 10. मुंबई : हृतिक रोशन-कंगना राणावत यांच्यातील वादप्रकरणी गुन्हे शाखेकडून आज अभिनेता हृतिक रोशनचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासाठी हृतिक सकाळी मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल झाला. वाचा सविस्तर