सचिन वाझे यांना अटक ते देशात लसीकरणाचा विक्रम; ठळक बातम्या क्लिकवर

breakfast news
breakfast news

देशात कोरोना लसीकरणाने वेग घेतला आहे. विषाणूवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं मत आहे. देशात शुक्रवारी 20.53 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याने लसीकरणाचा हा एका दिवसातील विक्रम आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात तडजोड करण्‍यात आली आहे. मिनियापोलिस येथील स्थानिक न्यायालय आणि फ्लॉइड याच्या कुटुंबामध्ये २.७ कोटी डॉलरवर (सुमारे १९६ कोटी रुपये) तडजोड झाली आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी द्रमुकने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती क्रमशः पाच व चार रुपये लिटर कमी करण्याची आणि गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. मनसुख हिरेन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे.


Record Vaccination: देशात शुक्रवारी 20.53 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याने लसीकरणाचा हा एका दिवसातील विक्रम आहे. वाचा सविस्तर-

विदेश- श्रीलंकेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरुन बुरख्यावर बंदी आणली जात आहे. यासोबतच एक हजारहून अधिक मदरशांवर आणि इस्लामिक शाळांवर देखील बंदी आणली जात आहे. वाचा सविस्तर-

काँग्रेसची फरफट: काँग्रेस इतका आकसत गेला आहे की आता या पक्षाला कुणाच्या तरी कुबड्यांखेरीज कोणत्याच राज्यात स्वबळावर लढायचा आत्मविश्र्वास उरलेला नाही. वाचा सविस्तर-

राष्ट्रहिताच्या नजरेतून : भारतातील लोकशाहीचे मानांकन कमी होण्याचा प्रकार जवळपास २५ वर्षांनंतर घडला आहे. वाचा सविस्तर-

चेन्नई- इंधन व गॅस दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी द्रमुकने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती क्रमशः पाच व चार रुपये लिटर कमी करण्याची आणि गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर-

Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट आल्याने इटलीत दुकान आणि शाळा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी जाहीर केला. वाचा सविस्तर-

विदेश- फ्रेंच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये शुक्रवारी एका अभिनेत्रीनं मंचावरच सर्व कपडे उतरवल्यानं खळबळ उडाली. शुक्रवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कोरिन मासेरियो हिने निषेध करत कपडे उतरवले. वाचा सविस्तर-

मुंबई- मनसुख हिरेन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- साप्ताहिक राशिभविष्य (ता. (१४ मार्च २०२१ ते २० मार्च २०२१). वाचा सविस्तर-

पिंपरी-चिंचवड शहरात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू होण्याची शक्यता. वाचा सविस्तर-

विदेश- कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूप्रकरणातील खटल्यात तडजोड करण्‍यात आली आहे. मिनियापोलिस येथील स्थानिक न्यायालय आणि फ्लॉइड याच्या कुटुंबामध्ये २.७ कोटी डॉलरवर (सुमारे १९६ कोटी रुपये) तडजोड झाली आहे. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com