esakal | केंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक ते चीनची नरमाईची भूमिका; वाचा देशविदेशातील बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

top news

भारत चीन सीमेवर सिक्कीम इथं शेतकरी पुन्हा झटापट झाली. यानंतर चीनने नरमाईची भूमिका घेत शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत असं म्हटलं आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.

केंद्र सरकारविरोधात शेतकरी आक्रमक ते चीनची नरमाईची भूमिका; वाचा देशविदेशातील बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. याठिकाणी राज्यातील नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा निषेध करत आंदोलन केलं. दुसरीकडे केंद्र सरकारने आता ग्रीन टॅक्सला मंजुरी दिली असून यामुळे जुन्या गाडीमालकांना भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तर मतदानासाठी आता मूळ गावी जाण्याची गरज पडणार नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्यासाठी आवश्यक अशा रिमोट वोटिंग प्रोजेक्टची चाचणी सुरु असल्याची माहिती देण्यात आली. भारत चीन सीमेवर सिक्कीम इथं शेतकरी पुन्हा झटापट झाली. यानंतर चीनने नरमाईची भूमिका घेत शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहोत असं म्हटलं आहे.

1. सीमेवर भारतीय जवानांच्या दणक्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया
सिक्किममध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनी सैनिकांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता चिनने नरमाईची भूमिका घेतली आहे. सविस्तर वाचा

2. Breaking:केंद्र सरकारची ग्रीन टॅक्सला मंजुरी; जुन्या गाड्यांवर भुर्दंड 
8 वर्षे जुन्या वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेटच्या रिन्युअलवेळी टॅक्स वसूल करण्यात येईल. याची गाइडलाइन जारी करण्याआधी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असं गडकरींनी सांगितलं. सविस्तर वाचा

3. मतदानासाठी गावी जावं लागणार नाही - निवडणूक आयोग 
मतदानावेळी बाहेरगावी राहणाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी यावं लागतं. अशावेळी रिमोट वोटिंग प्रोजेक्ट फायदाचा ठरू शकतो आणि मतदाराला कोणत्याही केंद्रावरून मत देता येईल. सविस्तर वाचा

4. VIDEO - ट्रम्प यांच्यामुळे White House च्या दरवाजात राष्ट्राध्यक्ष बायडेन वेटिंगवर 
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन पत्नी जिल यांच्यासह व्हाइट हाउसमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना ताटकळत उभा रहावं लागलं. सविस्तर वाचा

5. "पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही" - शरद पवार
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबईत दाखल झालेत.  सविस्तर वाचा

6. VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील' 
दुधाचे भाव स्थिर करण्यासाठी आम्ही अनुदान देत होतो. मात्र, साडेबारा कोटी देणार आहोत, असे आश्वासन या महाविकास आघाडीने दिले. पण, यांनी एक रुपयाही फेकून मारला नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. सविस्तर वाचा

7. राष्ट्रपतींनी नेताजींचा नव्हे, तर अभिनेत्याच्या पोर्ट्रेटचं केलं अनावरण? खरं काय वाचा
राष्ट्रपती कोविंद यांनी २३ जानेवारी २०२१ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त एका फोटोफ्रेमचं अनावरण केलं. सविस्तर वाचा

8. मनोरंजन क्षेत्राला आणखी धक्का;अभिनेत्री जयश्रीनं संपवलं आयुष्य
दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री जयश्री रमैय्यानं आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. तिच्या आत्महत्येमुळे कन्नड चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा

9. पुजारानं केलाय असाही पराक्रम; टी20 मध्ये झळकावलं होतं शतक!
कसोटी क्रिकेटमध्ये कमी सरासरीमुळे त्याच्यावर टीका केली जाते पण याच पुजाराने टी20 मध्ये शतकी खेळीही केली आहे. सविस्तर वाचा

10. पहिल्या बजेटबद्दलच्या या ऐतिहासिक गोष्टी आपल्याला माहितीयेत का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 1 फेब्रुवारी 2021 रोजी 'बजेट 2021-22' सादर करणार आहेत.  सध्या कोरोनाच्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थतज्ज्ञ, अभ्यासक तसेच सामान्य जनतेलाही या बजेटमधील घोषणांबाबत उत्सुकता आहे.  सविस्तर वाचा

loading image